Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांंची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरुन खडाजंगी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जागा वाटपावरुन वादाचे फटाके सुरु असतानाच आता शेतकरी कामगार पक्षही आक्रमक झाला आहे. सांगोल्याच्या जागेवरुन शेतकरी कामगार पक्षाने नाराजी व्यक्त करत वेगळा निर्णय घेण्याची तयारी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन जोरदार कलह सुरु आहे. सांगोला विधानसभेच्या जागेवरुन मविआमध्ये नवा वाद उभा राहिला असून याठिकाणी शेतकरी कामगार पक्ष लढण्यास इच्छुक आहे. मात्र ठाकरे गटाने दावा ठोकल्याने मिठाचा खडा पडला आहे. सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख इच्छुक आहेत मात्र त्याठिकाणी ठाकरे गटाने दिपक आबा साळुंखे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे.
यावरुनच नाराज झालेला शेतकरी कामगार पक्ष आठ जागांवर स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पक्षाच्या बैठकीत संध्याकाळी उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सांगोला, कंधार, उरण, पनवेल आलिबाग यासह आठ जागावर उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. महत्वाचं म्हणजे सांगोलामध्ये शरद पवार शेकापचे बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देतील, असे मोठे विधान रोहित पवार यांनी केले आहे.
दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातही विदर्भातील जागांवरुन मोठा तणाव सुरु आहे. काँग्रेसची ताकद असलेल्या विदर्भातील 12 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केल्याने तिढा सुटत नसल्याची माहिती समोर आली आहे. मची ताकद असल्याने आम्हाला जागा द्या ही काँग्रेसची भूमिका तर आमच्याकडे चांगला उमेदवार असल्याचे ठाकरे गटाचे मत आहे. यासंदर्भात आज काँग्रेसचे राज्यातील नेते हे के सी वेणुगोपाल यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहेत. सांगली प्रमाणे शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता जागा सोडवून घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.