Ashok Naigaonkar : 'पूर्वी दिवे नव्हते अंधाराची भीती नव्हती, आता दिवे खूप, अंधार कधी होईल सांगता येत नाही'; कवी नायगावकरांची राजकारणावर मिश्किल टिप्पणी

Poet Ashok Naigaonkar : देशात पाशवी बहुमत कुठेही येता कामा नये. देशातलं वातावरण एकाच अंगाने जाता कामा नये. कोणीतरी येईल आणि लोकशाही नाहीशी करेल ते दिवस आता संपलेले आहेत. असं मत कवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केलं.
Ashok Naigaonkar
Ashok NaigaonkarSaam T

देशात पाशवी बहुमत कुठेही येता कामा नये. देशातलं वातावरण एकाच अंगाने जाता कामा नये. कोणीतरी येईल आणि लोकशाही नाहीशी करेल ते दिवस आता संपलेले आहेत. असं मत कवी अशोक नायगावकर यांनी कोल्हापुरात आयोजित केलेल्या वार्ताला प्रसंगी व्यक्त केले आहे. याप्रसंगी बोलताना त्यानी पुणे इथे घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह या अपघातावर देखील आणि त्या संदर्भात देण्यात आलेल्या निकालावर देखील उपासात्मक टीका केलेली आहे.

देशातल्या राजकारणातील मालमसाल्याचा वीट आल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. पूर्वी दिवे खूप कमी होते पण अंधाराची भीती वाटत नव्हती, आता दिवे खूप झालेत पण केव्हा अंधार होईल हे सांगता येत नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. देशात उद्या काय होईल हे सांगता येत नाही अशीच परिस्थिती देशातल्या प्रत्येक समाज मनात आहे अनिश्चितेचे वातावरण आहे.

Ashok Naigaonkar
Maharashtra Politics 2024 : 'गडकरींना पाडण्यासाठी मोदी-शाहांचे प्रयत्न'; 'फडणवीसांनी पुरवली रसद', संजय राऊतांच्या आरोपांमुळे काँग्रेसचाही संताप

अशोक नायगावकरांची पुणे अपघात निकालावर उपहासात्मक टीका केली. पुण्याच्या अपघाताची बातमी वाचली आणि वाईट वाटलं. न्यायाधीश एका बाजूने निबंध लिहायला सांगत आहेत. हल्लीच्या मुलांना निबंध लिहायची सवय नाही तर निदान न्यायालय तरी मराठी भाषेच्या उद्धारासाठी काही प्रयत्न करत आहे असं म्हणायला हरकत नाही. असं विनोदाने, उपहासाने, उपरोधने आम्हाला म्हणावं लागतं.सध्या सगळं जागतिक वातावरणच बिघडलेल्याचं ते म्हणाले.

Ashok Naigaonkar
Maharashtra Politics 2024 : मतदानानंतरही बीडचा वाद शमेना; 'मतमोजणीला बीडचे अधिकारी नको', आयोगालाच लिहिलं पत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com