अमरावतीत पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये शहरात धरपकड सुरू

शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर आता पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात नेत्यांची अटक सुरू केली
अमरावतीत पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये शहरात धरपकड सुरू
अमरावतीत पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये शहरात धरपकड सुरूSaam Tv

अमरावती : शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर आता पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात नेत्यांची अटक सुरू केली आहे. आज सकाळी माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, भाजप मनपा सभागृह नेते तुषार भारतीय आणि निविदिता चौधरी यांना आज अटक करण्यात आली आहे. सर्वांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

भाजपच्या सर्व मोठे नेते आहेत, त्यांच्यावर जाळपोळ, लूटमार, हिंसाचार असे गुन्हे दाखल करण्यात आहेत. त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत होते. राज्यात अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त प्रमाणात हिंसक वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले. कालपासून अमरावती शहरात प्रचंड तणाव आणि दशहतीचे वातावरण आहे.अमरावती मधील Amravati राजकमल चौकात मोठ्या संख्येने जमाव एकवटला होता. दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस Amravati Police आणि पालकमंत्र्यांनी केले असून देखील जमावाकडून हिंसक घटना घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्रिपुरा या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ समाजातील एक गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आज देखील दिसत आहे.

अमरावतीत पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये शहरात धरपकड सुरू
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान- अमित देशमुख

144 कलम लागू असलेल्या, परिसरात कोणत्याही हिंसक घटना घडवणाऱ्यांना पोलीस तात्काळ अटक करु शकतात. या प्रकरणी वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. दरम्यान, अमरावतीत २ गटात वादाला हिंसक वळण मिळाल्यामुळे शहरात दंगानियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील काही ठिकाणी जमाव हिंसक झाला असला, तरीही उर्वरीत शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com