1 ते 22 डिसेंबर दरम्यान कोल्हापूरला सैन्य भरती होणार; सदाभाऊ खोत यांची माहिती

सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्र्यांना सैन्य भरती बाबत पत्र दिले होते.
1 ते 22 डिसेंबर दरम्यान कोल्हापूरला सैन्य भरती होणार; सदाभाऊ खोत यांची माहिती
1 ते 22 डिसेंबर दरम्यान कोल्हापूरला सैन्य भरती होणार; सदाभाऊ खोत यांची माहितीSaamTV

मुंबई : 'राज्यातील सैन्यभरती ही गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती या संदर्भात पाठपुरवठा करण्यासाठी उपख्युमंत्री अजित दादा पवार साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आम्ही एक शिष्टमंडळ सोबत घेतलं होतं, सैन्य भरती (Military recruitment) बाबतची गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना देखील हा विषय पटला आणि उपख्युमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना तातडीने आदेश देण्याबाबत सूचना केल्या' अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी दिली. तसेच सैन्यभरती आता आपल्या राज्यामध्ये सुरू होईल 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर कोल्हापूरला सैन्य भरती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Army recruitment will take place in Kolhapur from December 1 to 22)

हे देखील पहा -

'कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढल्यामुळे दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मुलांची वयोमर्यादा संपत चालली आहे. परंतु आता कोल्हापूर ए आर ओ (ARO) ची 1 डिसेंबर पासून भरती प्रक्रिया (Recruitment process) आहे. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांची भरती होणार आहे. तरी आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरतीसाठी मैदान उपलब्ध करून देणेबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना द्याव्यात. अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

1 ते 22 डिसेंबर दरम्यान कोल्हापूरला सैन्य भरती होणार; सदाभाऊ खोत यांची माहिती
"मविआ सरकार नौटंकी आहे त्यांना OBC समाजाला आरक्षण मिळवून द्यायच नाही"

या पत्रामध्ये त्यांनी भरती प्रक्रिया करने किती गरजेचे आहे. तसेच ती करताना कोरोना बाबतची सर्व खबरदारी देखील घेऊ मात्र या भरती करायलाच हव्या मुलांच वय वाढत आहेत अनेक तरुणांची वयोमर्यादा संपल्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय बनेल. तरी देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांच्या बाबतीत शासनाने तातडीने लक्ष घालावे. भरती प्रक्रियेबाबत अनेक तरुण आंदोलन करत आहेत. भविष्यात तीव्र आंदोलन होऊ शकते. आपण या सर्व बाबींचा सहानभूतीपूर्वक विचार करावा अशा विनंतीपर त्यांनी पत्र लिहल होत आता यावरती शासनाने सकारात्मकता दाखवली असून भरतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com