जालना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याची चर्चा सुरू असतानाच, स्वतः अर्जुन खोतकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटात जायचं की उद्धव ठाकरेंसोबत राहायचं याचा निर्णय उद्या जाहीर करणार असल्याचे अर्जुन खोतकर यांनी जालन्यात बोलताना सांगितलं. (Arjun Khotkar)
अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे शिंदे गटात गेल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दिल्लीत गेलेले अर्जुन खोतकर हे थेट जालना येथे आपल्या निवासस्थानी आले आहेत. खोतकर हे जालन्यात त्यांच्या दर्शना बंगल्यावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत केले.
यावेळी अर्जुन खोतकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केल्याच्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. माझा निर्णय अद्याप माझ्याशिवाय कुणालाही माहीत नाही. शिंदे गटामध्ये जायचं की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहायचं, याबाबतचा निर्णय मी उद्या जाहीर करणार आहे, असं खोतकर यांनी यावेळी सांगितलं. मी आज जर निर्णय जाहीर केला तर, काही लोकांना रात्रभर झोप लागणार नाही, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
अर्जुन खोतकर हे थेट दिल्लीहून जालन्याच पोहोचले. त्यांचे निवासस्थान दर्शना बंगल्यावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. अर्जुन खोतकर जालना येथे पोहोचण्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी अर्जुन खोतकर आपल्या दर्शना बंगल्यासमोर येताच, कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी खोतकर यांचे जोरदार स्वागत केले. अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची चर्चा झाल्यानंतर ते उद्या आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील खोतकर समर्थकांकडून एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांच्याबरोबरच अर्जुन खोतकर यांचा फोटो लावल्याने त्यांचा शिंदे गटातील प्रवेश हा निश्चित मानला जात आहे.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.