अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ; ईडीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दिले 'हे' निर्देश!

ईडीकडून या कारखान्याच्या खरेदी-विक्रीप्रकरणी चौकशी सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत कारखान्याची मालमत्ता, यंत्रसामग्री, जमीन विकण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
अर्जुन खोतकर
अर्जुन खोतकरSaam TV
Published On

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, जमीन आणि यंत्रसामग्री विक्रीस कोणतीही परवानगी देऊ नका, असे निर्देश ईडीने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ईडीने जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून हे निर्देश दिले आहे. ईडीकडून या कारखान्याच्या खरेदी-विक्रीप्रकरणी चौकशी सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत कारखान्याची मालमत्ता, यंत्रसामग्री, जमीन विकण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असंही ईडीने या पत्रात म्हटलं आहे. या पत्रामुळे शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय.

अर्जुन खोतकर
IPL 2022 Schedule: मुंबईत 26 मार्चपासून आयपीएल-2022 चे आयोजन; RTPCR अनिवार्य, जाणून घ्या नियम

जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना खरेदी -विक्री प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईडीकडे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची तक्रार केली होती.या तक्रारीनंतर ईडीने शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित संस्थांसह त्यांच्या घरावर छापेमारी करून खोतकर यांची चौकशी केली होती.

हे देखील पहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com