Chhatrapati Sambhaji Nagar : वाळुज एमआयडीसी परिसरात फुटली जलवाहिनी; दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना लाखो लिटर पाणी वाया

Aqueduct Burst : सध्या मार्च महिन्याचा शेवट सुरू आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा पारा वाढला आहे. अनेक खेड्या पाड्यांसह शहरांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. उन्हाळ्याचे अजून ३ महिने जायचे आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji NagarSaam TV

रामू ढाकणे

Aqueduct Burst In Aurangabad :

छत्रपती संभाजी नगर महामार्गावर वाळुज एमआयडीसीमधील गरवारे कंपनी समोर जलवाहिनी फुटली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी सध्या सुरू आहे. दरम्यान संभाजीनगरमधील जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने सुरूच आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar
Auranagabad News : पत्नीच्या आत्महत्येची बातमी कळताच पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; काळीज पिळवटून टाकणारी घटना

काही दिवसांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी चितेगाव जवळ फुटली होती. त्यानंतर लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. आज पुन्हा एकदा ही जलवाहिनी फुटल्याने यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. जलवाहिनी फुटण्याच्या घटना या सतत समोर येत असून आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

एकीकडे संभाजीनगर शहरांमध्ये पाणीटंचाई सुरू असून शहरातील काही भागांना आठ ते दहा दिवसाला पाणी येतं. तर दुसरीकडे जलवाहिनी फुटत असल्याच्या घटना घडत असताना नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसतेय. दरम्यान ही जलवाहिनी फुटल्याचा परिणाम वाळूज औद्योगिक परिसरात होण्याची शक्यता आहे.

सध्या मार्च महिन्याचा शेवट सुरू आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा पारा वाढला आहे. अनेक खेड्या पाड्यांसह शहरांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. उन्हाळ्याचे अजून ३ महिने जायचे आहेत. त्याआधीच नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. अशता आता जलवाहिनी फुटण्याच्या घटना देखील वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आता प्रशासनाकडून जलवाहिनीचे काम कधी पूर्ण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar
Nagpur Crime News : नागपुर तहसील पोलिसांची मोठी कारवाई, 8 लाखाच्या एमडी पावडरसह युवकास अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com