Judges In Supreme Court : न्यायाधीशांची नियुक्ती अखेर पूर्ण; एकूण संख्या ३४ वर

आता सर्वोच्च न्यायालयाच्या उर्वरित २ न्यायाधीशांच्या नियुक्तीवर देखील शिक्कामोर्तब झाला आहे.
Supreme court
Supreme court saam tv
Published On

Judges In Supreme Court : गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांची रिक्त असलेली पते आता पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. अशात गेल्या आठवड्यात ५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या उर्वरित २ न्यायाधीशांच्या नियुक्तीवर देखील शिक्कामोर्तब झाला आहे. (Latest Judges In Supreme Court News)

गेल्या काही दिवसांपासून या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता थांबला आहे. कराण न्यायाधीशांची संख्या अखेर पूर्ण झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे. या दोन नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ३४ झाली आहे.

Supreme court
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायाधीशांच्या नियुक्ती; कॉलेजियमच्या शिफारसीवर केंद्र सरकारचं शिकामोर्तब

या अगोदर रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या पूर्ण झाली होती. गेल्या शनिवारीचं केंद्रसरकारने ५ न्यायाधीशांच्या नावाला मंजूरी दिली होती. 3 डिसेंबरला भारताचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजियमने या ५ नावांची शिफारस केली होती.

Supreme court
Supreme Court on Love-Jihad : धर्मांतर ही एक गंभीर बाब - सुप्रीम कोर्ट, पाहा हा स्पेशल रिपोर्ट

न्यायमूर्ती पंकज मिथल (राजस्थान उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश), न्यायमूर्ती संजय करोल (पटना उच्च न्यायालय चे मुख्य न्यायाधीश), न्यायमूर्ती पी वी संजय कुमार (मणिपुर उच्च न्यायालय चे मुख्य न्यायाधीश), न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह (न्यायाधीश,पटना उच्च न्यायालय) आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा (न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालय) यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली होती.

या शिफारसीला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर सोमवारी यांचा शपथविधी पार पडला होता. या सर्व नियुक्तीनंतर आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि कॉलेजिअममध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीवरून वाद सुरू होते. या वादानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या पूर्ण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com