ज्ञानगंगा अभयारण्यातील जंगल सफारीचा लाभ घेण्याचे आवाहन...

सकाळी 6 ते 9 आणि दुपारी 3 ते 6 पर्यंत अभयारण्यात पर्यटनाची वेळ...
ज्ञानगंगा अभयारण्यातील जंगल सफारीचा लाभ घेण्याचे आवाहन...
ज्ञानगंगा अभयारण्यातील जंगल सफारीचा लाभ घेण्याचे आवाहन...संजय जाधव
Published On

बुलढाणा - कोरोनाच्या Corona संकटानंतर आता बुलडाण्यातील Buldhana ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये Gyanganga Sanctuaries पर्यटनासाठी सुरुवात करण्यात आली आहे. 22 हजार हेक्टर क्षेत्रफळावर विखुरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यमध्ये, अस्वल, बिबट, तडस, लांडगे, उदमांजर, या हिस्त्र प्राण्यांसह हरीण, सायाळ, नीलगाई, चौशिंगा यासह विविध प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत आणि पर्यटन करताना पर्यटकांना यामधील बऱ्याचशा प्राणी, पक्ष्यांचे दर्शन होत असते त्यामुळे या ज्ञानगंगा भरण्यात जंगल सफारीसाठी आता पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील पहा -

ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारी करण्यासाठी दोन ठिकाणी याची बुकिंग केली जाते, ज्यामध्ये खामगाव परिक्षेत्रातील बोथा चिंच फाटा या गेटवर तर बुलडाणा वन्यजीव परिक्षेत्रासाठी गोंदनखेड या गेटवर ऑफलाइन पद्धतीने निर्धारित वेळेत आपण प्रत्यक्ष जाऊन बुकिंग करू शकतो, तर ऑनलाइन पद्धतीने "मॅजिकल मेळघाट" या शासकीय वेबसाईटवर देखील ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करू शकतो, तर ऑफलाईन बुकिंगसाठी 9545772093 त्याचबरोबर 8888354716 या नंबर वर संपर्क करून आपण बुकिंग करू शकतो.

सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 3 ते 6 अशा निर्धारित वेळेत कोविड नियमांचे पालन करत पर्यटकांना जंगल सफारी करता येणार आहे, यादरम्यान पर्यटक आपले स्वतःचे वाहन देखील जंगल सफारीसाठी जंगलात घेऊन जाऊ शकतात, तर उपस्थित असलेल्या सफारी वाहनाद्वारे पर्यटन केल्यास 2450 रुपये शुल्क आकारण्यात येते, ज्यामध्ये गाईड सह 5 पर्यटकांचा समावेश राहील. यामध्ये 350 रुपये गाईड शुल्क, 1 हजार 700 रुपये सफारी वाहन शुल्क, आणि 400 रुपये शासकीय शुल्काचा समावेश आहे.

ज्ञानगंगा अभयारण्यातील जंगल सफारीचा लाभ घेण्याचे आवाहन...
पारोळ्यात दरेकरांच्या जोडे मार; राष्‍ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून निषेध

या जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना बुलडाणा वनपरिक्षेत्रातील दानमाळ, सागरमाळ, लाखाचा झीरा, आणि ज्ञानगंगा अभयारण्याला ज्या नदी मुळे ज्ञानगंगा नाव मिळाले त्या ज्ञानगंगा नदीचे उगमस्थान, त्याचबरोबर पलढग डॅम बोटींग इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे दाखविली जातात, तर खामगाव परिक्षेत्रातील चिंच फाट्यावरून माटरगाव डॅम, पलढग डॅम याठिकाणी बोटिंग करता येणार आहे.

या ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात प्राणी आणि पक्षी वास्तव्यास असल्याने पर्यटकांनी या ज्ञानगंगा अभयारण्याला एकदा भेट देऊन नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा असे आवाहन वन विभागाच्या वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com