Maharashtra : लाचखोरी, काॅपी, पेपर फुटीची प्रकरणं चव्हाट्यावर; महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची अब्रूची लक्तरे वेशीवर...

वैद्यकीय रजा कालावधीचा वेतन काढण्यात आले नव्हते.
ACB, Bribe, Gondia
ACB, Bribe, GondiaSaam Tv

Gondia : वैद्यकीय रजेचे देयक काढण्यासाठी नऊ हजाराची लाच मागणारा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत केंद्र प्रमुख एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. जिल्हा परिषद शाळा गांगला येथे एसीबीने रचलेल्या सापळ्यात धनपाल श्रीराम पटले (47) रा. नेहरु वार्ड तिरोडा हा केंद्रप्रमुख अलगद सापडला. (gondia latest marathi news)

दरम्यान राज्यात सध्या बारावी, दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. काही जिल्ह्यांत काॅपीची, पेपर फुटीची प्रकरणं ताजी असतानाच लाचखाेरीची प्रकरण देखील घडू लागल्याने शिक्षण विभागाला लागलेली दुष्काकर्माची कीड कधी संपणार असा सवाल उपस्थित हाेत आहे.

ACB, Bribe, Gondia
Saam Impact : 'साम' चा दणका; एसपींनी ताे प्रकार पाहताच पाेलिसांची केली बदली, वरिष्ठस्तरावर चाैकशी सुरु

तक्रारकर्ता भंडारा (bhandara) येथील असून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागात शिक्षक पदावर कार्यरत आहे. तक्रारकर्ता शिक्षक डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान वैद्यकीय रजेवर होता. वैद्यकीय रजेनंतर जानेवारीमध्ये तो कर्तव्यावर हजर झाला. मात्र वैद्यकीय रजा कालावधीचा वेतन काढण्यात आले नाही.

दहा हजार रुपयांची मागणी

त्यामुळे तक्रारकर्ता शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला. वेतन काढण्यास सातत्याने टाळाटाळ होत असल्यामुळे शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधला. दरम्यान गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत विषय शिक्षक तथा केंद्र प्रमुख धनपाल श्रीराम पटले यांच्याशी त्यांनी संपर्क केले असता वैद्यकीय रजेचे वेतन काढण्यासाठी केंद्र प्रमुखाने 10 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. (Maharashtra News)

ACB, Bribe, Gondia
Maharashtra : राज्यातील पुरवठा विभागाचे कर्मचारीही निघाले संपावर; जाणून घ्या कारण

तक्रारकर्ता शिक्षकाला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्याने गोंदिया लाचलुचपत विभागात धाव घेतली. एसीबीने तक्रारीची सहनिशा केली. त्यानंतर सापळा रचला. तिरोडा तालुक्यातील गांगला येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत पंचासमक्ष केंद्र प्रमुख धनपाल श्रीराम पटले याला नऊ हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात पटले विरुद्ध लाचलुचपत कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com