गुन्ह्यातून नाव काढून टाकतो! लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

पाच हजराची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.
police constable annabhau shirsath
police constable annabhau shirsathsaam tv
Published On

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. चोरीच्या घटनांही धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलीस (Police) प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, औरंगाबाद शहरातील वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. गुन्ह्यातून नाव काढून टाकण्यासाठी तक्रारदाराकडून (Bribe Crime) पाच हजराची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहे. अण्णासाहेब शिरसाठ असे आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

police constable annabhau shirsath
ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली - अजित पवार

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ कार्यालयात नोंद झालेल्या गुन्ह्यातून नाव काढून टाकून कारवाई होणार नाही, असं शिरसाठने तक्रारदार व्यक्तीला सांगितलं होतं. त्यानंतर तक्रारदाराकडे गुन्ह्यातील नाव काढून टाकण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी आरोपी शिरसाठने केली होती.

त्यानंतर या रक्कमेत तडजोड करून पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची एसीबीला खबर मिळताच आरोपी विरोधात सापळा रचण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराकडून पाच हजरांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com