एसटी कर्मचाऱ्यांशी आमचे वैर नाही; त्यांनी नागरिकांची अडवणूक करू नये, अन्यथा...

न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस प्रत्येक एसटी डेपोच्या ठिकाणी लावण्यास सांगितली आहे. याचा अर्थ न्यायालयाने आम्हाला कारवाई करण्याचे संकेत दिल्याचे देखील परब म्हणाले.
Anil Parab
Anil ParabSaamTV
Published On

रत्नागिरी : सरकार जसं एसटी कर्मचाऱ्यांना बांधिल आहे. त्याप्रमाणे ते जनतेला देखील बांधिल आहेत. त्यामुळे यापुढे आता कारवाई तीव्र केली जाईल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपावर बोलताना दिला आहे. यावेळी बोलताना परब म्हणाले, एसटी संपाबाबत आम्ही सातत्याने कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच कामावर परतण्याबात आवाहन करत आहोत. मात्र, काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसलेत व कामावर हजर झालेले नाहीत. न्यायालयाने व सरकारने देखील वारंवार या कर्मचाऱ्यांना संप ताणू नये व जनतेस वेठीस धरू नये असे सांगितले आहे.

आता न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस प्रत्येक एसटी डेपोच्या ठिकाणी लावण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ न्यायालयाने आम्हाला कारवाई करण्याचे संकेत दिल्याचे देखील यावेळी परब म्हणाले. 

एसटी कर्मचाऱ्यांशी सरकारचे वैर नाही हे त्यांनी समजून घ्यावे. एसटी कर्मचाऱ्यांप्रती जसे आमचे दायित्व आहे तसेच ते महाराष्ट्रातील जनतेप्रती देखील आहे. आज जवळपास दीड महिन्यांपासून हा संप सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्वच प्रवाश्यांना याचा मोठा त्रास होत आहे. शाळकरी व कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांसह सर्वांनाच या संपाचा फटका बसतोय.

या संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच महामंडळाचे देखील मोठे नुकसान होत आहे. हे कामगारांनी समजून घ्यावे. मी पुन्हा आवाहन करेल कि कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, संप ताणू नये. बडतर्फीची कारवाई आता सुरु झाली आहे. यातून कर्मचाऱ्यांचेच नुकसान होणार आहे. ज्या नेत्यांचे ऐकून हा संप ताणला जात आहे. ते नेते या कर्मचाऱ्यांचे नुकसान भरून देऊ शकणार नाहीत. असे परब म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत...

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कॅबिनेटनं राज्यापालांना प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे. 28 डिसेंबर रोजी निवडणूक घ्यावी असं या प्रस्तावात म्हटलं आहे. हात उंचावून आणि आवाजी मतदानानं असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचं देखील परब यांनी म्हटलं आहे. 

CBI कडून कोणतीही नोटीस नाही :

दरम्यान, मला सीबीआयकडून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. या संदर्भातील बातम्या कोण पुरवतं हे मला माहित नसल्याचं परब यांनी सीबीआयनं पाठवलेल्या नोटीसीवर म्हटलं आहे. 

तोपर्यंत निवडणुका नको :

ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार उद्या अधिवेशनात ठराव करत आहे. जोवर ओबीसी इंम्पिरिकल डाटा जमा होत नाही. तोपर्यंत निवडणुका होऊ नये असा सरकारचा मानस असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

किरीट सोमय्या 100 कोटी दावा :

किरिट सोमय्यांच्या बोलण्याचं मला काहीही फरक पडत नाही. मी कोर्टात गेलो आहे. एकतर त्यांना 100 कोटी द्यावे लागतील किंवा माझी माफी मागावी लागेल असं परब यांनी म्हटलं आहे. शिवाय, सदर बंगला हा सदानंद कदम यांचा असल्याचा उल्लेख देखील परब यांनी केला आहे.

शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना परब म्हणाले, कदम माझे वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. असं म्हणत, कदम यांच्या मुद्यावर परब यांनी पुन्हा एकदा बोलणं टाळलं आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com