जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे जीव वाचवणारे अकोल्यातील देवदूत !

अकोल्यातील पातूरचे गौरव श्रीनाथ व रंजीत गाडेकर ठरले पर्यटकांसाठी देवदूत; दोन युवक व एका महिलेचे वाचवले प्राण
जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे जीव वाचवणारे अकोल्यातील देवदूत !
जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे जीव वाचवणारे अकोल्यातील देवदूत !जयेश गावंडे

अकोला : गेल्या दोन वर्षात नावारूपाला आलेल्या धोधानी पर्यटन परिसरात असलेल्या धबधब्या जवळील डोहात काही तरुण पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी एक तरुण बुडत होता. बुडणाऱ्या युवकाने उपस्थितांकडे मदतीसाठी आवाज दिला मात्र, कोणीही त्याच्या मदतीला जाण्याचे धाडस करत नव्हते. तिथेच उपस्थितीत असलेल्या त्या तरुणाच्या मित्रांनी देखील बघ्याची भूमिका घेतली होती. त्याचवेळी बाजूला झाडा खाली बसलेल्या गौरव सुरेश श्रीनाथ याने त्या युवकास बुडताना वाचवले.

हे देखील पहा -

गौरव याने हवेने भरलेले टयुब त्या बुडणाऱ्या युवकाकडे फेकले. परंतु सदर युवकाला ते पकडता आले नाही. ते बघताच गौरव ने स्वतः च्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि त्या युवकाचे प्राण वाचविले. तर मागील आठवड्यात धोदाणी धबधबा येथे पर्यटनासाठी अकोल्याहून दाते कुटुंब आले होते. त्या परिवारातील महिला डोहा शेजारी उभी असताना तोल जाऊन पाण्यात पडली. पाय घसरून प्रवाहामध्ये वाहत जाऊन ती महिला थेट धबधब्याच्या खोल पाण्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत देखील झाली.

जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे जीव वाचवणारे अकोल्यातील देवदूत !
शाळेचे शिपाई कांदा लागवडीसाठी संस्थाचालकाच्या शेतात !

त्याच वेळी, तिथे उपस्थित असलेला युवक रंगीत गाडेकर याने पाण्यामध्ये उडी घेऊन महिलेला पाण्याच्या बाहेर आणले आणि त्यांना उपचाराकरिता अकोला येथे जाण्यास मदत देखील केली. मागिल आठवड्यामध्ये अकोला येथील रहिवासी शुभम नावाचा मुलगा घसरून पडल्याने त्याचे सुद्धा प्राण रणजित गाडेकर यांनी वाचवले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्याचे त्यांचे सत्कार्य प्रेरणादायी असून, गौरव व रणजीत या तरुण युवकांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com