SRPF जवानाचा स्वत: वर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न; जालन्यात खळबळ

अनिल गाढवे वय वर्ष ३५ असं असून स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या जवानाचे नाव आहे.
Jalna News
Jalna NewsSaam TV

जालना: जालना शहरातील राज्य राखीव पोलीस (SRPF) बल गट क्रमांक ३ च्या हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना जालना (Jalna) शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (State Reserve Police Force)

अनिल दशरथ गाढवे वय वर्ष ३५ असं असून स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या जवानाचे नाव आहे. अनिल गाढवे हे कर्तव्यावर असताना त्यांनी स्वतःच्या हातात असलेल्या बंदुकीने गळ्यावर गोळी मारून घेतल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास समोर आली.

पाहा व्हिडीओ -

गेल्या एक वर्षांपासून गाढवे हे कौटुंबिक आणि मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी गाढवे यांची पत्नी घर सोडून माहेरी होती. त्यामुळे ही ते त्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर कर्ज असल्याने ही तो मानसिक तणावात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) उपनिरीक्षक यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदरील जवानास गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com