Crime News : दहा लाखांचा शासकीय तांदूळ जप्त; दोघांना अटक

वाहन चालकांकडे कुठलीही ठाेस कागदपत्रे मिळाली नाहीत.
Ration ,
Ration , saam tv

- अमर घटारे

Amravati News : खुल्या बाजारात विक्रीसाठी शासकीय तांदळाची वाहतूक पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे पकडला. या कारवाईत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ट्रकसह १० लाखांचा तांदूळ जप्त करण्यात आला. (Amravati Latest Marathi News)

भातकुलीतील (amravati) आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळील एका जुन्या इमारती जवळ हा ट्रक पकडला ट्रकमध्ये पोत्यात भरून असलेला ३० हजार किलो तांदूळ आढळून आला तसेच जुन्या बिल्डिंगजवळ पत्र्याच्या कम्पाऊंडमध्ये २० हजार किलो तांदूळही (rice) पथकाला दिसून आला. त्यानुसार १० लाखांचा तांदूळ व ट्रक असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Ration ,
Ambernath : अंबरनाथ गोळीबार प्रकरण राजकीय वैमनस्यातून; पंढरीनाथ फडके अटकेत, ३२ जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी ट्रकचालक जावेद खान हारुन खान व सहकारी नईम बेग इस्माईल बेग यांना ताब्यात घेण्यात आले. तांदळाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी हा माल हा अमोल सुरेश महल्ले याचा असल्याचे सांगितले. त्यांच्याजवळ मात्र कुठलीही कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी भातकुली पोलिसांच्या (police) ताब्यात देण्यात आला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Ration ,
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : 'भीमा' च्या मतमाेजणीस प्रारंभ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com