
अमर घटारे
अमरावती : हवामान विभागाने अमरावतीला आज ऑरेंज अलर्ट जरी केला होता. त्यानुसार अमरावतीच्या अनेक भागात दुपारी (Heavy Rain) मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला हित. यात वरुड तालुक्यातील (Farmer) शेतकरी सुधीर बिडकर यांचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Breaking Marathi News)
अमरावती जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. तर दुसरीकडे शहरालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक देखील थांबली आहे. यात एक गाय पुलावरून पाण्याच्या प्रवाहात गाय वाहून गेली. याची दृश्य कॅमेरात कैद झाली आहे. तर शेतात काम करत असताना अचानक विजांच्या कडकडाट होऊन विज पडून सुधीर बिडकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
धरणाचे १३ दरवाजे उघडले
मुसळधार झालेल्या पावसामुळे पश्चिम विदर्भातले सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समजलं जाणारा अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले आहेत. ३६२ घनमीटर सेकंदाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
वाशिममध्ये महिलेचा मृत्यू
वाशीम : वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान अंगावर वीज पडल्याच्या दोन ठिकाणी दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. यात अनसिंग येथे एका महिलेचा अंगावर विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना मानोरा तालुक्यातील रुई गोस्ता शेतशिवरात अंगावर वीज पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. सुनील जंगम या शेतकऱ्याची ही बैल जोडी शेतात झाडाखाली बांधली असताना अंगावर वीज पडल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला असुन यात या शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झालं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.