Melghat : मेळघाटमधील तलावाचा बांध फुटला; रस्ते रहदारीसाठी बंद, गावांचा संपर्क तुटला, शेतीचेही मोठे नुकसान

Amravati News : १९७७-७८ मध्ये हा बंधारा बांधण्यात आला होता. त्याची दुरुस्ती २०१३-१४ मध्ये करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या बैठकीत या तलावाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: मेळघाटमधील धारणी तालुक्यातील बारू गावातील सिंचन विभागाने बांधलेल्या तलावाचा बांध फुटल्यामुळे मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पाण्यामुळे बारू- बीजू धावडी हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. 

मेळघाट परिसरातील धरणी तालुक्यात बारू गावाजवळ सिंचन विभागाकडून बंधारा उभारण्यात आला होता. या तलावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असते. यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा साचला होता. मात्र या तलावाचा बांधण्यात आलेला मातीचा बांध अचानकपणे फुटल्यामुळे तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित होऊ लागले आहे. हे पाणी आजूबाजूच्या परिसरात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

Amravati News
Parbhani Crime : किरकोळ कारणातून वाद; धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू, एक गंभीर

२०१४ पासून देखभाल दुरुस्ती नाही 

या दुर्घटनेमुळे बारू, बीजू धावडी, ढाकणा, अकोट व परतवाडा मार्गावरील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. १९७७-७८ मध्ये हा बंधारा बांधण्यात आला होता. त्याची दुरुस्ती २०१३-१४ मध्ये करण्यात आल्याचे सिंचन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या बैठकीत या तलावाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र २०१४ पासून या तलावाची देखभाल न केल्याने अखेर हा तलाव अखेर फुटला आहे. याचा त्रास मात्र मेळघाट मधील नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

Amravati News
Fraud Marriage : विवाह लावून देत फसवणूक; लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या पर्दाफाश

मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडले

सध्या मध्यप्रदेशासह धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेले मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण ९६ टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सर्व १३ दरवाजे ५५ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. त्याचा विसर्ग वर्धा नदीपत्रात केला जातो आहे. यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला असून अमरावती, वर्धा, यवतमाळ आणी चंद्रपूर या चार जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात किंवा वर्धा नदीपत्रात कोणी जाऊ नये अश्या सूचना देखील देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com