Liquor Drinkers Meeting: काय सांगता? अमरावतीत रंगणार चक्क मद्यपींचे संमेलन; आजी-माजी मद्यपींचा राहणार सहभाग

Amravati Liquor Drinkers Meeting: आजवर तुम्ही समाजाच्या विविध स्तरावर कार्य करणाऱ्यांचे संमेलन ऐकले किंवा पाहिले असतील. पण आता चक्क मद्यपींचे संम्मेलन होणार आहे.
Amravati News meeting of liquor drinkers will take place in amravati City
Amravati News meeting of liquor drinkers will take place in amravati City Saam TV
Published On

Amravati Liquor Drinkers Meeting: आजवर तुम्ही समाजाच्या विविध स्तरावर कार्य करणाऱ्यांचे संमेलन ऐकले किंवा पाहिले असतील. पण आता चक्क मद्यपींचे संम्मेलन होणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनाला आजी व माजी मद्यपी उपस्थित राहून आपला मद्यपानाचा अनुभव सांगणार आहे. अमरावती शहरात हे संम्मेलन होणार आहे.

अशाप्रकारचे अधिवेशन आतापर्यंत पुणे, नागपूर येथे झालेले आहे. आता अमरावतीमध्ये (Amravati News) होणार आहे. सध्या समाजात दारूची समस्या बिकट रूप धारण करीत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून मोठमोठे गुन्हे देखील घडत आहेत. याशिवाय दारू ही अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावण्याचे प्रमुख कारण बनली आहे.

त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे सतत आणि अतिमद्यप्राशन केल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्या देखील होत आहेत. मद्यपी व्यक्तीला कालांतराने होणाऱ्या आजारामुळे केवळ तोच प्रभावित होतो असे नाही तर त्याचे अख्खे कुटुंब प्रभावित होत असते.

कुणीही दिलेले सल्ले ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नसतात. त्यामुळे कुटुंबीयसुद्धा त्रस्त होतात. मग पोराबाळांची आबाळ, खर्चाला पैसे नसल्याने पती-पत्नीतील भांडणे, वादविवाद असे अनेक टप्पे यामध्ये निर्माण होत असतात.

अशा परिस्थितीत अल्कोहलिक्स अ‍ॅनानिमस या संस्थेच्या पुढाकारातून शहरातील जवळपास २०० युवक व नागरिकांना स्वतःला आलेल्या वाईट अनुभव दुसऱ्यांना येऊ नये, या हेतूने या चळवळीत आपले सहकार्य दिले आहे.

विशेष बाब म्हणजे, या अधिवेशनातील मार्गदर्शक असलेली व्यक्ती स्वतःचे आडनाव न सांगता केवळ आपले नाव आणि नावासमोर दारुड्या, हा शब्द आवर्जून लावतात. त्यामुळे सभागृहात उपस्थित अन्य मद्यपींचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे आयोजकांचे म्हणणे आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com