Maharashtra Assembly Election : मेळघाट परिसरातील ६ गावांचा मतदानावर बहिष्कार; मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ एकवटले

Amravati News : गावांमध्ये मूलभूत सुविधा ज्यात पाणी, रस्ते, नाल्या, वीज नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने परिसरातील सहा गावांमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी हा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.  

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. गावागावात प्रशासकीय यंत्रणा पोहचली असून सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच (Amravati News) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील सहा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांमध्ये मूलभूत सुविधा ज्यात पाणी, रस्ते, नाल्या, वीज नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. सुविधा देण्याबाबत केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

Amravati News
Raigad News : निवडणुकीच्या दिवशी बिरवाडीमध्ये भानामतीचा प्रकार; चौकात तीन मडके व नारळ रचले

आधी सुविधा तरच मतदान  
अमरावतीच्या मेळघाट परिसरातील रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी बहिष्कार टाकला आहे. ६ गावात मिळून १ हजार ३०० मतदार आहेत. या सर्वानी मिळून निर्णय घेतला असून आधी सुविधा द्यावी, नंतर मतदान करण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला आहे. दोन दिवसांपासून गावात याबाबत बॅनर देखील लावण्यात आलेले होते.

प्रशासनात खळबळ 

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असल्याने प्रशासकीय यंत्रणा कालपासूनच गावात पोहचली होती. दरम्यान आज सकाळी सातवाजेपासून मतदानाला सुरवात झाली असता एक देखील ग्रामस्थ मतदान केंद्रावर पोहचला नाही. दरम्यान ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समजल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com