Amravati Accident: अमरावतीमध्ये २ कारची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; तिघे गंभीर

Amravati Car Accident: अमरावतीच्या दर्यापूर-अकोला मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर तिघे जखमी झालेत.
Amravati Car Accident
Amravati Car AccidentSaam Tv
Published On

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दोन कारची समोरासमोर धडक होऊ हा अपघात झाला. या अपघातामध्ये ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीच्या दर्यापूर-अकोला मार्गावर हा भीषण अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर -अकोला मार्गावर आज दुपारच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. गोळेगाव लातूरच्या जवळ दुपारी तीनच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी येवडा पोलिसांनी धाव घेतली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर मृतकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

Amravati Car Accident
Accident : तंबाखू थुंकण्यासाठी धावत्या बसचे दार उघडले, बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

या अपघातामध्ये एका कारमधील आनंद बाहकर (२६ वर्षे रा. सांग्लुडकर नगर), बंटी बिजवे (३८ वर्षे रा. गजानन मंदिर साईनगर), प्रतीक बोचे (३५ वर्षे रा. सांग्लुडकर नगर) या तिघांचा मृत्यू झाला. तर कार मधील चौथा पप्पू घाणीवाले जखमी झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल हे दोघे जण जखमी झाले आहेत. प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे चौघे कारने अकोल्याला जात होते. तर विरुद्ध दिशेने आकाश आणि रमेश अकोल्यावरून दर्यापूरकडे जात होते.

Amravati Car Accident
Mumbai Accident: कार चालवाताना BMW चालकाला आली फिट, ३ वाहनांना जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कारची समोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. एका जखमीवर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल या पितापुत्रांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Amravati Car Accident
Accident : दुर्दैवी! २६ वर्षीय IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू,गाडीचा टायर फुटल्यानं घडली दुर्घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com