Amravati News : दारूच्या नशेत शिक्षक टुल्ल; वर्गातच केली लघुशंका, धक्कादायक VIDEO समोर

शिक्षक मध्यधुंद अवस्थेत चक्क वर्गात दारू पिऊन झोपलाय.
Amravati Teacher Viral Video
Amravati Teacher Viral Video Saam TV
Published On

Amravati Teacher Viral Video : अमरावती (Amravati) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील मेळघाटमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा (Teacher) मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओत शिक्षक मध्यधुंद अवस्थेत चक्क वर्गात दारू पिऊन झोपलाय. त्याचवेळी शाळेतील विद्यार्थी मस्ती करताना दिसून येताहेत. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच परिसरातून संताप व्यक्त केला जातोय. (Amravati News Live Today)

Amravati Teacher Viral Video
Gondiya News : प्रेयसीसोबत हॉटेलात गेला, रूममध्ये घडली हादरवणारी घटना

व्हिडिओत काय आहे?

प्राप्त माहितीनुसार, व्हायरल झालेला हा व्हिडिओ धारमी तालुक्यातील कारकरमल येथील जिल्हा परिषद शाळेतील आहे. व्हिडिओत शाळेतील शिक्षक दारू पिऊन वर्गात विचित्र अवस्थेत झोपी गेला आहे. त्याचवेळी आपल्याला ऑफ प्रेड मिळाला म्हणून वर्गातील मुलंही धिंगाणा घालताना दिसत आहेत.

अशातच एक व्यक्ती वर्गात येतो आणि या मद्यपी शिक्षकाला जागी करतो. इतकंच नाही तर, तो त्याला प्रश्न देखील विचारतो. त्यानंतर हा शिक्षक वर्गातील हलत-डुलतच बाहेर जातो. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघुशंकाही केलेली असते. (Amravati Latest Marathi News)

दरम्यान, याबाबत वर्गातील विद्यार्थ्याना विचारलं असता, सर सकाळीच दारू पिऊन आले होते. असं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. असं कृत्य सरांनी पहिल्यांदाच केलं असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच, गावातील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com