अमरावती - "शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे" असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले.
हे देखील पहा -
आषाढी वारीसाठी कौडण्यापूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी हिरवी झेंडा दाखवला. यावेळी 'पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते.पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते श्री क्षेत्र कौडण्यापूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी व पालखीचे पूजन झाले.
कौडण्यापूर येथून दरवर्षी आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते. यावर्षीही 40 वारकऱ्यांना घेऊन पालखीसह पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी दोन शिवशाही बसेसची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात पुरेशी दक्षता बाळगून वारी पार पडत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वांनी आपल्यासह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी पांडुरंगाचरणी जनसामान्यांच्या हिताप्रती प्रार्थना केली.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.