अमरावती : मालेगाव, अमरावती आणि नांदेड या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. आतापर्यंत ३६ बनावट सोशल मीडिया अकाउंट समोर आली असून, त्यानुसार सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे देखील पहा-
अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी या ठिकाणी संचारबंदी तर आजूबाजूच्या जिल्ह्यांत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद देखील करण्यात आली आहेत. नाशिक पोलिसांनी मालेगाव हिंसाचार प्रकरणी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
तसेच नाशिक, नांदेड आणि अमरावती पोलिसांनी हिंसाचाराविषयी आपला एक स्वतंत्र अहवाल तयार करून राज्य पोलीस मुख्यालय आणि गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे. या खात्यांद्वारे त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचार विषयीचे फेक मेसेज तयार करून व्हायरल करण्यात आले आहेत. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील अपशब्द वापरल्याची माहिती यावेळी मिळाली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.