छत्रपतींबाबत भाजप खासदारांच्या आक्षेपार्ह विधानाचा अमोल कोल्हेंकडून समाचार; नेमकं खुपतंय काय? केला सवाल

यामुळे महापुरुषांवरून सुरू असलेल्या राजकारणावर खासदार अमोल कोल्हे चांगलेच संतापले आहेत.
Amol Kolhe Latest News
Amol Kolhe Latest NewsSaam Tv

Amol Kolhe Latest News: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर असल्याचे म्हटल्यावर महाराष्ट्रात भाजपने आक्रमक निदर्शने केली. हा वाद कायम असतानाच भाजपच्या एका प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले. याने राजकीय वातावरण आणखी पेटले आहे. अशात आता खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजप प्रवक्त्यांना नेमक खुपतंय काय? असा जाब विचारला आहे.

राज्यात एकीकडे राहुल गांधींचे सावरकरांवरील वक्तव्य, त्यानंतर राज्यपालांनी शिवाजी महाराजांची केलेली तुलना या गोष्टी कमी होत्या की काय, यात भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आणखी एक नवा वाद ओढावून घेतला. यामुळे महापुरुषांवरून सुरू असलेल्या राजकारणावर खासदार अमोल कोल्हे चांगलेच संतापले आहेत.

'छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केले आणि मनात एकच प्रश्न निर्माण झाला की, नेमकं खुपतयं काय तुम्हाला? असा सवाल खासदार कोल्हेंनी केला आहे. सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्यात ते पुढे म्हणाले की, "कधी भाजपचे प्रवक्ते तर कधी राज्यपाल अशी वक्तव्ये करतात म्हणजे तुम्हाला नेमकं काय खुपत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्ता आणि राजसत्ता या एकमेकांच्या वरचड असू नये तर दोघींनी एकमेकींच्या हात हात घालून लोककल्याणाचे काम करावे असा आदर्श घालून दिला हा तुम्हाला खुपतोय?'

Amol Kolhe Latest News
Rahul Gandhi Vs BJP : राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केला: भाजप

छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे हे वास्तव अधोरेखीत केले. अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र आणलं, रयतेचं राज्य निर्माण केलं हे तुम्हाल खुपतयं का? असे सवाल त्यांनी भाजपला विचारले आहेत.

Amol Kolhe Latest News
Amol Kolhe Exclusive | 'झालेला धिंगाणा असमर्थनीय; मात्र इतिहासाशी छेडछेडा शोभनीय नाहीच -अमोल कोल्हे

ज्यावेळी औरंगजेबासमोर भले भले राजे मान खाली करून उभे होते तेव्हा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर मिळवून हिंदूस्तानाच्या मातीला स्वाभिमान काय असतो हे शिकवले. त्यांच्याविषयी तु्म्ही अशी वक्तव्ये करता. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत, मात्र ते आम्हाला देवा पेक्षा कमी नाहीत हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, असे अमोल कोल्हे म्हणाले. तसेच सुधांशू त्रिवेदी यांनी जाहीर माफी मागत भारतीय जनता पार्टीने (BJP) शिवरायांविषयी त्यांच्या मनात असलेली भूमीका जाहीर करावी असेही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com