Ravi Rana: हनुमान चालीसेचा विरोध म्हणून त्यांची पार्टी अन्‌ आमदारही राहले नाही; रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंना टोला

हनुमान चालीसेचा विरोध म्हणून त्यांची पार्टी अन्‌ आमदारही राहले नाही; आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Ravi Rana Uddhav Thackeray
Ravi Rana Uddhav ThackeraySaam tv

अमर घटारे

अमरावती : हनुमान चालिसेला विरोध केला यामुळे उद्धव ठाकरेंना महागात पडले. कारण त्यांना बजरंगबलीने श्राप दिला. त्यांचे आमदार आले नाही व त्यांची पार्टीही राहिली नाही. त्यांचे पदही राहीले नाही; असा हल्लाबोल (Ravi Rana) रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. (Breaking Marathi News)

Ravi Rana Uddhav Thackeray
VIDEO: तरुणानं पुलावरून नदीत मारली उडी, वाचवण्याऐवजी लोक व्हिडिओ काढत राहिले; तरुणानं गमावला जीव

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठनाचा हट्ट धरणारे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राना हे दाम्पत्य राज्यात चर्चेत आले होते. तर आज पुन्हा राणा दाम्पत्याने अमरावतीच्या कल्याण नगर येथील मैदानात सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. यावेळी नवनीत राणा व रवी राणा यांनी मोठ्या उत्साहात हनुमान चालीसा पठण केले.

जो विरोध करेल त्‍याचा सत्‍यानाश

आमदार रवी राणा यांनी बोलतांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. हनुमान चालीसा म्हटलं म्हणून उद्धव ठाकरे यांनी 14 दिवस आम्हाला जेलमध्ये टाकले होते. तर जो हनुमानजीचा विरोध करेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही रवी राणा यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com