ओबीसी आरक्षण - सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार केंद्र सरकारची भेट

आज पकंजा मुंडे, बावनकुळे, नाना पटोले, सुनील केदार ओबीसी परिषदेला येणारअसून सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारकडे जाण्याचा विचार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे सांगितले
ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार केंद्राची भेट - विजय वडेट्टीवार
ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार केंद्राची भेट - विजय वडेट्टीवार- Sonali Shinde
Published On

लोणावळा : आज पंकजा मुंडे Pankaja Munde, चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले Nana Patole , सुनील केदार ओबीसी OBC परिषदेला येणारअसून सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारकडे जाण्याचा विचार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी येथे सांगितले. या प्रश्नावर मोर्चा काढण्यापेक्षा कायदेशीर लढाई महत्त्वाची आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. All Party Delegation to meet Central Government over OBC Reservation Say Vijay Wadettiwar

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या दोन दिवसीय शिबिराचा आज दुसरा, शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. आज सर्व राजकिय पक्षातील आजी-माजी मंत्री येथे विचारमंथन करणार आहेत. या संदर्भात 'साम टिव्ही' ला दिलेल्या खास मुलाखतीत वडेट्टीवार यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाबाबत माहिती दिली.

दरम्यान, ''सध्या कोविडच्या परिस्थितीत राज्य सरकारला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे जो डाटा आहे, तो त्यांनी आम्हाला द्यावा जेणेकरून आम्ही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील कार्यवाही करू शकू. यासाठी आम्ही सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत की, त्यांच्याकडे असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी महाराष्ट्र सरकारला द्यावा, हा आमचा प्रयत्न आहे," अशी माहिती काल वडेट्टीवार यांनी दिली होती.

ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार केंद्राची भेट - विजय वडेट्टीवार
पायी वारीचा निर्णय तीन दिवसांत घ्या, अन्यथा....

दरम्यान, काही राजकीय पक्षांनी आपल्या ओबीसी समाजाला वापरून घेतल्यानंतर आता आपल्याला फेकून देण्याची तयारी होते आहे. ओबीसींना गेल्या काही काळात चांगलेच चटके बसले. त्यामुळेच ओबीसी समाज एकत्र आला. आता ही आग पेटली आहे. ही धगधगती आग आता विझू देऊ नका, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी ओबीसी बांधवांना केले.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com