राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठक (पहा व्हिडिओ)

भविष्यातील रणनीती सुद्धा या बैठकीत ठरवली जाणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठकसंजय डाफ
Published On

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS दोन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठकीला आजपासून नागपूरात Nagpur सुरुवात झाली आहे. रेशीमबाग Reshambagh येथील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सकाळी 9.30 वाजता बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत संघ परिवारातील देशभरात असलेल्या 36 संघटना सहभागी झाल्या आहेत.

संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि इतर पदाधिकारी सहभागी होतील. भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती आणि संघ परिवारातील 36 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाल्या.बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा येण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाच्या वतीने संघटन सचिव बी.एल. संतोष लेखाजोखा मांडतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठक
Solapur : नारायण राणे आणि मोदींच्या प्रतिमेला दुधानं अभिषेक... (पहा व्हिडिओ)

वर्षभरात संघटनने काय काम केले याचा लेखाजोखा हे प्रतिनिधी बैठकीत मांडतील. भविष्यातील रणनीती सुद्धा या बैठकीत ठरवली जाणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये होऊ घातलेली निवडणूक, पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव, इंधन दरात सातत्याने होत असलेली वाढ, खाजगीकरण, गुंतवणूक आणि देशातील इतर विषयांवर चर्चा आणि मंथन या बैठकीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com