संजय राठोड
यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने युवक मोठ्या संख्येने अवैध हातभट्टी दारूच्या आहारी गेले असून हजारो संसार या व्यसनामुळे उघड्यावर आले आहेत. ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कायमच दुर्लक्ष केल्याने अवैध हातभट्टी दारू गाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातूनच तरूणांना हातभट्टीचे व्यसन जडल्याने कायदा व सुव्यस्था धोक्यात आल्याचे चित्र आहे.
मोह, गुळ आणि तुरटी याला एकत्र करून आठ दिवस एका ड्रमामध्ये त्याला सडवतात त्या नंतर सडवलेल्या मोहाला उकळून त्या पासून दारू बनवता. या मध्ये कोणी जिवघेणे केमिकल टाकून अवैध हातभट्टी दारू गाळतात त्यामुळे पिणाऱ्यांना नशा झटकेपट चढते. या विषारी गावठी दारू मुळे अनेक जण दगावल्याची घटना घडली आहे. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात व्यसन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे हातभट्टी दारू पेट्रोल पेक्षा जास्त वेगाने आग पकडते.
यवतमाळ जिल्ह्यात अवैध दारू बंदी बाबत अनेक वेळ लोकचळवळ उभी राहिली या दरम्यान मोठ मोठी आंदोलन देखील झाली मात्र उपयोग काहीच झाला नाही. उलट गावगाड्यात हातभट्टी गाळणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे ग्रामीण भागात घराघरात वादविवाद होण्याच्या घटना घडत आहे. दारूच्या व्यसनी गेलेली व्यक्ती हे दारूची तलब भागविण्यासाठी घरातील महिलांना मोलमजुरी साठी पाठवतात आणि मोलमजुरी करून आणलेल्या पैशावर पुरूष दारूचे व्यसन करतात. पैसे न दिल्यास घरातली महिलांना मारहाण देखिल करतात. यातून हजारो संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहे.
ग्रामीण भागातील गावात वीस ते पंचवीस वर्षाच्या तरुण मुली विधवा झालेल्या आहेत. कौटुंबिक प्रश्न दारुमुळे निर्माण झालेले आहे. दारूमुळे वर्षाला कितीतरी अपघात होतात. चोरीच्या गुन्ह्याला प्रोत्साहनाचे मुळ कारण कारण दारु आहे. दारूसारख्या जिवघेण्या पदार्थाला राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रस्थान का देते अशा सवाल उपस्थित केला जातोय.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.