अकोला : ओबीसी आरक्षण OBC Reservation रद्द झाल्यानंतर सर्वाधिक फटका बसला तो अकोला जिल्हा परिषदेत Akola ZP सत्तेवर असलेल्या वंचित बहुजन आघाडीला. Vanchit Bahujan Aaghadi वंचितचे तब्बल आठ सदस्य रद्द झाले होते मात्र आता आघाडीला पुन्हा आपले वर्चस्व दाखविण्यात यश आले आहे. आज जाहीर झालेल्या निकालांनुसार अकोला जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये In Elections एकूण 14 जागा होत्या त्यापैकी सहा जागांवरती आघाडीने विजय मिळवला आहे. (Akola Zilla Parishad results again dominated by the vanchit Bahujan Aghadi)
हे देखील पहा -
वंचित बहुजन आघाडी ६ राष्ट्रवादी २ तर शिवसेना, भाजप, प्रहार,काँगेस यांना प्रत्येकी एक जागा तर अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे अकोल्यात पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचेच वर्चस्व पहायला मिळाले असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांसाठी Prakash Ambedkar राजकीय अस्तित्वाची लढाई मानल्या जाणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेच्या निकालामुळे प्रकाश आंबेडकरांचे अस्तित्व पुन्हा सिद्ध झाले आहे.
शंकरराव इंगळे, मीना बावणे, सुशांत बोर्डे, सुनील फाटकर, राम गव्हाणकर, संगिता अढाऊ अशी विजयी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची नावं आहेत.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.