Akola Crime News : दारूड्या पतीला संपवण्यासाठी पत्नीनंच दिली 'सुपारी'; असा झाला उलगडा

Akola Crime News Update : पतीचा मृतदेह गावच्या बाहेर एका लोखंडी हुकला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
Akola Akot Crime News
Akola Akot Crime NewsSAAM TV

Akola Crime News : दारुड्या पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीच्या हत्येचा कट रचून त्यानं आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीनं केला होता. पोलीस तपासात ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला.

सचिन घमराव बांगर असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना अकोल्यातील अकोट तालुक्यातील पुंडा येथे घडली होती. डिगांबर प्रभाकर मालवे असं आरोपीचं नाव आहे. तर कंचन सचिन बांगर असं सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव आहे. पती दारू पेऊन सतत शारिरीक आणि मानसिक त्रास देत असल्याने पत्नीने सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Akola Akot Crime News
Pandharpur News : विठ्ठल भेटीची इच्छा अपूर्ण राहिली; दर्शनासाठी निघालेल्या पती-पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू

अकोला जिल्ह्यातील दहिहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुंडा येथील सचिन बांगर यांचा लोखंडी हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. ही घटना २८ डिंसेबर रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता सचिनच्या अंगावर जखमा तसेच दोरीने बांधल्याचे व्रण दिसून आले होते. पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असावी असा संशय आला होता. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आणि वैद्यकीय अहवालासह पोलीस तपासात सचिन याची हत्या झाल्याचे समोर आले. (Latest Marathi News)

Akola Akot Crime News
Pune : पुण्यात चाललंय काय? शहरात कोयता गँगचा धुमाकूळ; सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

तपासावेळी सचिनची पत्नी कंचन हिची कसून चौकशी झाली. त्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली. पत्नीनेच पती सचिन याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झालं. दहीहंडा पोलिसांनी पत्नी कंचन आणि एका आरोपीला म्हणजेच मारेकऱ्याला अटक केली आहे. शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी पुढील तपास दहीहंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत करीत आहेत. (Crime News)

सचिन घमराव बांगर पास्टुल येथील रहिवासी होता. त्याचे अकोट तालुक्यातल्या पुंडा येथील कंचन हिच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेले. सचिनला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत पत्नी कंचन हिला सतत मारहाण व शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. मागील अडीच वर्षापासून कंचन ही माहेरी पुंडा राहायला गेली. तिथेही सचिनचा त्रास सुरू झाला. या त्रासाला पत्नी कंचन त्रासली.

तिनं पतीला संपवण्याचा कट आखला. पुंडा गावातील शेजारी राहणाऱ्या डिगांबर प्रभाकर मालवे याला पतीची हत्या करण्यास सांगितले. सचिनला जीवे मारून टाक, तुझ्या मुलीलाही तो त्रास देत असल्याचे तिने आरोपीला सांगितले. याशिवाय त्याला ३० हजार रुपये देते, असंही सांगितले. डिगांबर याने कंचनच्या घरी सचिनची गळा आवळून हत्या केली. त्यांनतर त्याचा मृतदेह गावच्या बाहेर असलेल्या लोखंडी हुकला बांधून लटकवले आणि गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला. पोलीस तपासात ही बाब उघडकीस आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com