Suicide: निवडणुकीसाठी ५ लाख रुपये आणण्यासाठी तगादा; विवाहित महिलेची आत्महत्या

निवडणुकीसाठी ५ लाख रुपये आणण्यासाठी तगादा; विवाहित महिलेची आत्महत्या
Akola Suicide Case
Akola Suicide CaseSaam tv

अकोला : पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी तगादा लावला होता. याला कंटाळून या महिलेने स्वत:चे आयुष्य संपवले (Suicide) असल्याचे नातेवाइकांचे आरोप आहेत. आता या प्रकरणात सासरच्या मंडळींवर उरळ पोलिस (Police) ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असून तिच्या पतीला अटक केली आहे.

Akola Suicide Case
भीषण अपघात..तीन तरूणांचा जागीच मृत्‍यू, सहा जखमी

नंदा रामदास साबळे (वय ४५ रा. मांजरी, अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ एप्रिल २०२१ रोजी जयश्री हिचा विवाह पैलपाडा येथील आशिष वसंतराव नागे यांच्यासोबत झाला. आशिष एका खाजगी व्यवसाय करतो. तर सासरचेही राजकीय क्षेत्रात आहे. सासरे वसंतराव मारोती नागे हे वंचित बहुजन आघाडीच्या पक्षावर पंचायत समिती सदस्य राहले असून अकोला पंचायत समितीचे माजी सभापती देखील राहिले आहेत. तर सासू शोभा नागे हे सध्या पंचायत समिती सदस्य आहेत. वसंतराव नागे, जेठ नितीन वसंतराव नागे, सासू शोभा पैलपाडा आणि नणंद जयश्री सुभाष खराटे आणि वेदांती अनिल पातोंड (रा. टवलार, ता. अचलपूर जिल्हा अमरावती) असे तिच्या सासरच्यांची नाव आहेत. दरम्यान, सुरुवातीला सासरच्यांनी जयश्री नागे यांना चांगले वागविले. काही दिवस गेल्यानंतर सासरच्यांनी पती आशिष वसंतराव नागे आणि सासर मंडळींनी तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.

अडीच लाख आणून दिले तरीही..

गेल्या काही दिवसांपासून जयश्री नागे यांना निवडणुकीसाठी ५ लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी तगादा लावला होता. माहेरकडील आर्थिक परिस्थिती ठीक नसतानासुध्दा जयश्री हिने २ लाख ५० हजार रुपये सासरी आणून दिले. मात्र, त्यानंतर तिचा छळ कमी होईल आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल, असे वाटले होते. परंतु, पुन्हा उर्वरित २ लाख ५० हजार रुपयांसाठी तिचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. तर पती आशिष नागे ती माहेरी गेली असतानासुध्दा मोबाइल फोनद्वारे पैसे आणण्यासाठी धमक्या देत होता. त्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप नंदा साबळे यांनी केला आहे. तशी तक्रार उरळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. या तक्रारीनुसार सासरच्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पती आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुलगी झाली म्हणूनही छळ

जयश्रीला १० मे रोजी मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून तिच्या नागे कुटुंबीयांनी अतोनात छळ केला होता. तर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जाणीवपूर्वक त्रास देऊन जयश्री यांना पती आशिष नागे यानेसुध्दा मारहाण केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

जयश्रीने 'पेनड्राइव्ह'मध्ये केला डाटा गोळा..

जयश्रीने पैलपाडा येथील सासरच्यांनी कशाप्रकारे शारीरिक व मानसिक छळ केला आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा डाटा पेन ड्राइव्हमध्ये गोळा केला आहे. आपल्या आत्महत्येस सदर आरोपीच जबाबदार असल्याचे जयश्रीने स्पष्ट म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com