अकोला : अकोल्यातील कौलखेड येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या ७ वर्षाच्या मुलीने ५ तासांत ५१ पर्यावरणपूरक गणपती बनवून नवा विक्रम केला आहे. तिच्या या उपक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डने (India Book Record) नोंद घेतली आहे. पूर्वा प्रमोद बगळेकर असे या चिमुकलीचे नाव आहे. (akola news Record of seven year old girl 51 Bappas made in five hours Recorded in India Book)
कौलखेड येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या व सात वर्षाच्या पूर्वा प्रमोद बगळेकर हिने पाच तासात ५१ पर्यावरणपूरक गणपती (Ganpati Bappa) बनविले आहे. ही कला तिच्या वडिलांकडून पाहून शिकली आहे. वडील हे शिल्पकार तर आणि आई ममता या चित्रकार आहे. त्यामुळे तिच्यामध्ये हे गुण आपसूकच आले आहे. तिच्या या कलेमुळे तिने अकोल्याचे (Akola) नाव देशपातळीवर कोरले आहे.
इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
पूर्वाच्या या कार्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे. १७ जानेवारीला तिची नोंद इंडिया बुक रेकॉर्डने केले असल्याचे मेलद्वारे सांगण्यात आले आहे. तिने इतरही स्पर्धेत पारितोषिक मिळविले आहे. तिला तिचा हा विक्रम आता लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Limca Book of Records) कोरायचा आहे. यासाठी ती आणखी परिश्रम करणार असल्याचे तिने सांगितले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.