महापालिकेसाठी दिल्लीत 'पॉवर' गेम? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Civic Poll Equation: कडाक्याच्या थंडीतही दिल्लीचं राजकीय वातावरण तापलंय..कारण दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली..या भेटीत महापालिका निवडणुकीची बीजं आहेत...ती नेमकी कशी आणि पवार काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय घडलं..
Ajit Pawar and Sharad Pawar seen together during the Delhi meeting that triggered fresh speculation of an NCP reunion.
Ajit Pawar and Sharad Pawar seen together during the Delhi meeting that triggered fresh speculation of an NCP reunion.Saam Tv
Published On

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगलीय.. आणि त्याला कारण ठरलंय हिवाळी अधिवेशन सोडून अजित पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवसा निमित्तानं दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला लावलेली हजेरी.... विशेष म्हणजे याच भेटीत अजित पवार आणि शरद पवारांनी बंद दाराआड तब्बल 20 मिनिटं चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...तर या भेटीची इनसाईड स्टोरी समोर आलीय...

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कौटुंबिक आणि राजकीय विषयांवर चर्चा

पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकत्र येण्याविषयी चर्चा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकत्र आल्यास फायदा होण्याची शक्यता

पवारांना पुन्हा राज्यसभेवर निवडून देण्यासंदर्भातही चर्चा

खरंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत कागल, चंदगड, कराड आणि कुरुंदवाडमध्ये भाजप आणि शिंदेसेनेला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पहायला मिळालं.. त्यातच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, अशी मागणी जोर धरतेय.. तर पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध दर्शवलाय..

मात्र त्यानंतर दिल्लीत पवार काका-पुतण्याची भेट झाल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.... मात्र या भेटीमागे राजकीय गणित नसल्याचा दावा दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय...

एका बाजूला मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांना महायुतीतूनच टार्गेट केल्याची चर्चा रंगलीय... दुसरीकडे महापालिका निवडणूका आणि पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या 42 मतांचं गणित यासारख्या कारणांमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगलीय...मात्र दिल्लीतील भेटीनंतर पवार काका पुतण्या ठाकरे बंधूंप्रमाणे भाजपविरोधात एकत्र येणार का? यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com