Ajit Pawar News: पोपट मरू दे नाहीतर उडून जाऊ दे, आम्हाला काही अडचण नाही; अजित पवार काय म्हणाले, वाचा...

Ajit Pawar Latest News: गेल्या काही काही दिवसापासून महाराष्ट्राचं राजकारणं पोपटाभोवती फिरतयं.
Ajit Pawar Slams CM Eknath Shinde Devendra Government Fadnavis Maharashtra Political Latest Marathi News
Ajit Pawar Slams CM Eknath Shinde Devendra Government Fadnavis Maharashtra Political Latest Marathi NewsSaam TV

Ajit Pawar Latest News: गेल्या काही काही दिवसापासून महाराष्ट्राचं राजकारणं पोपटाभोवती फिरतयं. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला होता. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत घेणार आहेत. दरम्यान, यावरून महाविकास आघाडीतील नेते आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘पोपट मेलाय’ असे वक्तव्य करत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ‘पोपट अजून जिवंत आहे’ असे म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले होते. अशातच विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पोपटावरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच टोला लगावला आहे. (Breaking Marathi News)

Ajit Pawar Slams CM Eknath Shinde Devendra Government Fadnavis Maharashtra Political Latest Marathi News
Devendra Fadnavis Reaction: नोटबंदीच्या निर्णयाबाबत फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "कुणी काळा पैसा..."

पोपट मरू दे नाहीतर उडून जाऊ दे, आम्हाला काही अडचण नाही. महागाई, शेतकरी प्रश्नांवर बोला, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. (Latest Marathi News)

काय म्हणाले अजित पवार?

"मी वस्ताद आहे, कार्यकर्त्यानो तुमची ताकद दाखवा. आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला जागा वाटपात स्थान देण्याचे बघतो. महापालिका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, नंतर लोकसभा लागतील. त्यामुळे राज्य ढवळून काढावे लागेल", असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना केले.

"महापुरुषांच्या विचाराने राष्ट्रवादी पक्ष चालवला जात आहे. कोल्हापूर जिल्हा नेहमीच शरद पवारांच्या जवळचा राहिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खूप काम करावं लागेल", असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Slams CM Eknath Shinde Devendra Government Fadnavis Maharashtra Political Latest Marathi News
CM Eknath Shinde News: 'विरोधकांकडे जास्तीच्या नोटा असतील...'; नोटाबंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

अजित पवार यांनी मेळाव्यात बोलताना भाकरी फिरवावी लागणार आहे आणि भाकरी फिरवली जाणार असल्याचे सुतोवाच केले. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्व तयार करण्याचा आता आमचा प्रयत्न आहे, असंही अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सत्ताधारी आमदारांची वक्तव्ये वाईट आहेत, सत्तेची नशा त्यांच्या डोक्यात आहे, पण जनतेच्या डोक्यात पण पन्नास खोके बसलेत. पक्ष स्थापन कुणी केला, पक्ष कुणाचा कोर्टाने निकाल दिला असेल पण जनतेला हे पटले का? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.  (Maharashtra Political News)

हे सरकार काही ना काही गोष्टी सांगून निवडणूका पुढे ढकलत आहे. कारण त्यांना कल्पना आलीय की या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये राग आहे, त्यामुळे निवडणूका पुढे ढकलल्या जात आहेत. पोपट मरू दे नाहीतर उडून जाऊ दे, आम्हाला काही अडचण नाही. महागाई, शेतकरी प्रश्नांवर बोला, असं म्हणत अजित पवारांनी सरकारचे चांगलेच कान टोचले आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com