राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत नगरच्या मल्लांना दोन पदके

भाग्यश्री फंड, सोनाली मंडलिकला पदक
भाग्यश्री फंड, सोनाली मंडलिकला पदक

अहमदनगर ः उत्तर प्रदेशातील अमेठी येथे सुरू असणाऱ्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील श्रोगोंदा येथील इंटरनॅशनल कुस्ती संकुलाच्या महिला कुस्तीगिरांनी 1 रौप्य व 1 कांस्यपदक जिंकून दमदार कामगिरी केली. 59 किलो वजनीगटात पै.भाग्यश्री फंडने रौप्यपदक, तर 62 किलो वजनीगटात पै. सोनाली मंडलिक हिने कांस्यपदक पटकावले.Ahmednagar wrestlers win two medals in National Women's Wrestling Championship abn79

भाग्यश्री फंड, सोनाली मंडलिकला पदक
महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नगरचे तीन खेळाडू

पै.भाग्यश्रीने तुल्यबळ कुस्त्या जिंकत फायनल फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम कुस्तीत पुष्पा हरियाणासोबत केवळ 1 गुणाने पराभवाचा सामना करावा लागला. रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पै. सोनाली मंडलिक हिची तब्येत अतिशय खराब होती. तिला सतत ताप येत होता. मात्र, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवायचे हे ध्येय धरलेल्या सोनालीने जिद्द ठेवत कुस्ती स्पर्धेत प्रवेश केला. औषध गोळ्या घेऊन ती लढली आणि कांस्यपदक जिंकून आणले. तिच्या जिद्दीचे कुस्ती क्षेत्रात कौतुक होत आहे.Ahmednagar wrestlers win two medals in National Women's Wrestling Championship abn79

दोन्ही महिला कुस्तीगीर श्रीगोंदा येथील इंटरनॅशनल कुस्ती संकुलात एनआयएस कुस्ती कोच पै. किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. संकुलाचे संस्थापक व सर्वेसर्वा हनुमंत फंड यांनी अत्यंत अल्प वेळेत राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर या संकुलात घडवले. अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी महिला कुस्तीगीरांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सतत या संकुलास मार्गदर्शन व मदत पुरवली आहे. दोन्ही महिला कुस्तीगीरांचे कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com