Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

रस्त्यासाठी आंदोलन..रस्त्यावरच भरविली शाळा

रस्त्यासाठी आंदोलन..रस्त्यावरच भरविली शाळा
Published on

अहमदनगर : जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील गेवराई रस्त्यावर एक अनोखे आंदोलन करण्यात आले. बालम टाकळी ते कांबि या रस्त्यासाठी ग्रामस्थ आणि जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने एकेरी वाहतूक बंद तर रस्त्यावरच शाळा (School) भरो आंदोलन करण्यात आले. (Ahmednagar News Road Blok)

Ahmednagar News
Jayant Patil: जयंत पाटील यांच्‍याविरोधात पोलिसात तक्रार; बेकायदेशीर बस चालविल्याचा आरोप

शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील बालम टाकळी ते कामबी या रस्त्यावरून (Ahmednagar) वाहन चालवणे ते दूर पाई चालणे देखील कठीण झाले आहे. या गावातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून पायपीट करावी लागते. 6 किलो मिटर लांबीच्या या रस्त्यावर 800 ते 900 लोकवस्ती आहे. हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.

एक वेळेस अश्या चिखलातून पुरुष कसे बसे पायी जातात. परंतु महिलांनी कसा प्रवास करावा. तसेच गेली अनेक वर्षे झाली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या रस्त्याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ड्रेस बरोबर आणावे लागतात. चिखलातून प्रवास करून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर दुसरा ड्रेस बदलून शाळेत जावे लागते. तसेच शेवगाव तालुक्यात अनेक रस्ते असे आहेत. लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी हर्षदा काकडे यांनी केली आहे. शेवगाव तालुक्यातील या रस्त्यासाठी आज गेवराई रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी एक रस्ता हा वाहतुकीसाठी खुला होता. तर रस्त्यावरच शाळा भरली होती. जिल्हा परिषदेच्यावतीने रस्त्या करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com