सुशील थोरात
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज भाजप व शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक (Ahmednagar) भिडल्याचे पहावयास मिळाले. भाजपचे (BJP) नगरसेवक मनोज कोतकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांची चांगलीच हमरातुमरी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याइतपत खडाजंगी झाली. मात्र इतर नागरसेवकांनी मध्यस्ती करत हा वाद थांबवला. (Breaking Marathi News)
अहमदनगर शहरातील विविध 14 विषयांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेने सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. (Shiv Sena) शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू असताना या सभेत पाणी प्रश्न तसेच कचरा आणि लाईट प्रश्नावर नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.
दोघे अंगावर धावून गेले
सभेदरम्यान केडगावचे भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांनी प्रभागातील प्रश्नांवर बोलण्यासाठी उभे राहिले. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी महापौरांना सांगितले की विषय पत्रिकेवरील विषय घेण्यात यावे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर हे भिडले आणि जर आम्हाला आमच्या प्रभागातील विषय बाबत बोलू द्यायचे नसतील, तर सर्वसाधारण सभा का ठेवली? असे म्हणत नगरसेवक सचिन शिंदे यांना सुनावले. त्यावरून दोघांमध्ये चांगलीच तू तू मैं मैं सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याइतपत खडाजंगी झाली. मात्र इतर नागरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवला.
एकमेकांना दिली धमकी
अहमदनगर महानगरपालिकेत सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून भाजप विरोधी पक्षाचे भूमिका बजावत आहे यादी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी भर सभेमध्ये आरोग्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच छापले होते तेव्हाही हा वाद चांगलाच विकोपाला गेला. भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर बोलत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांच्यात बोलल्याने वाद पेटला आणि थेट एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन एकमेकांना बघून घेऊ असेही दोघांकडून धमकी देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.