वडील दोन दिवसात घरी येणार म्हणून मुलं खूश, पण काळाचा घाला; आगीत मृत्यू

मात्र अचानक काळाने घाला घातल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वडील दोन दिवसात घरी येणार म्हणून मुलं खूश, पण काळाचा घाला; आगीत मृत्यू
वडील दोन दिवसात घरी येणार म्हणून मुलं खूश, पण काळाचा घाला; आगीत मृत्यूSaam TV
Published On

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला संगमनेर तालुक्यातील अश्वि खुर्द येथील दिपक विश्वनाथ जेडगुले वय 38 यांचा देखील मृत्यू झाला.मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दीपक यांना 10 दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झाली होती दोन दिवसात त्यांना डिचार्ज मिळणार होता. मात्र अचानक काळाने घाला घातल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दीपक जेडगुले यांना दोन महिण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती त्यांना संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आणि आर्थिक हालकीची परिस्थिती बिल भरण्या इतकी नसल्याने त्यांना नगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात 10 दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत होती आणि दोनमध्ये त्यांना डिचार्ज मिळणार होता. मात्र त्या पूर्वी आय सी यु विभागाला आग लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

वडील दोन दिवसात घरी येणार म्हणून मुलं खूश, पण काळाचा घाला; आगीत मृत्यू
Hingoli: एसटी कंडक्टरचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

दीपक हे अवघ्या 38 वर्षाचे होते ते मिळेल तिथे काम करून आपल्या संसाराचा गाडा हकत होते, त्यांची पत्नी कल्पना ही देखील मोल मजूरी करून संसाराला हातभार लावत होती, या पती-पत्नीला दोन मुले आहे. साहिल वय 15 आणि आदित्य वय 13 असे या मुलांचे नाव असून या दोन मुलांच्या शिक्षणासाठी पोटाची खळगी भागवण्यासाठी मोलमजुरी करायचे त्यांना घरकुल योजनेतून घरही मिळालं होतं. एकंदरीत संसाराचा गाडा गरीबीची परिस्थिती असतानाही जेमतेम व्यवस्थित सुरू होता आणि दोन ते तीन दिवसात दिपकला डिस्चार्ज मिळणार असल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं.

दीपावली आर्थिक हालकीची परिस्थिती मध्येच गेली मात्र आपला पती घरी येणार असल्याने पत्नी कल्पना आनंदात होती मात्र अचानक काळाने घाला घातला आणि पतीचे निधन झाल्याची बातमी कानावर आली अन सगळं काही होत्याचं नव्हतं झालं आता या मुलांचे शिक्षण कसं करणार ही सगळी जबाबदारी मी कशी पुढे नेऊन हाच आक्रोश पत्नी कल्पना करत आहे त्यामुळे शासनाने माझ्या मुलांकडे पाहून चांगल्या प्रकारे मदत करावी हीच मागणी पत्नी कल्पना यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com