Fraud : बनावट शासन निर्णयाद्वारे ५ कोटींची कामे मंजूर; ठेकेदारावर गुन्हा दाखल, ठेकेदार फरार

Ahilyanagar News : बनावट शासन निर्णयाचा वापर करत ५ कोटी ६५ लाखांची ३३ कामे मंजूर करून घेतली. यातील १३ कामे पूर्ण करून त्यांच्या बिलांची मागणी ग्रामविकास विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर केली
Ahilyanagar News
Ahilyanagar NewsSaam tv
Published On

सुशील थोरात 

अहिल्यानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेली विकास कामे करण्यासाठी ग्रामविकास विभागाचा बनावट शासन निर्णय संबंधित ठेकेदाराने केला. हा शासन निर्णय दाखवून तब्बल ५ कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे मंजूर करून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आता कोतवाली पोलिसात ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

अहिल्यानगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणात संबंधित ठेकेदाराने ग्रामविकास विभागाचा ३ ऑक्टोंबर २०२४ चा बनावट शासन निर्णय दाखविला. या शासन निर्णयाद्वारे अहिल्यानगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांचे ३३ विकास कामे मंजूर करून घेण्याचे काम ठेकेदार अक्षय चिर्के याने केले होते. 

Ahilyanagar News
Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या; पुण्यात तक्रार दाखल

मंजूर कामातील १३ कामे केली पूर्ण 

विधानसभा निवडणुकीपूर्वी ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या बनावट शासन निर्णयाचा वापर करून चिर्के याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १५ ऑक्टोबर १०२४ रोजी एकूण ५ कोटी ६५ लाखांची ३३ कामे मंजूर करून घेतली होती. यातील १३ कामे पूर्ण करून त्यांच्या बिलांची मागणी ग्रामविकास विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आली. मात्र तपासणीअंती ठेकेदाराने बांधकाम विभागाकडे दिलेला शासन निर्णय बनावट असल्याचे उघडकीस आले. 

Ahilyanagar News
Shirdi Sai Baba : साई चरणी ६५ लाख रुपयांचे सोने चांदीचे दान; गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची साई दरबारी अलोट गर्दी

ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकरणी ग्रामविकास विभागाकडून संबंधित ठेकेदार चिर्के याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ उपअभियंता सचिन चव्हाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ठेकेदार चिर्के याच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आता आरोपी ठेकेदाराच्या शोधावर आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com