Nashik: अफगाणी धर्मगुरू हत्या प्रकरणात भाजपची उडी; SIT मार्फत सखोल चौकशीची आशिष शेलारांची मागणी

Muslim spiritual guru from Afghanistan shot dead in Nashik : या घटनेनं देशात एकच खळबळ उडाली होती. आता प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
Afghan Sufi preacher murdered in Nashik
Afghan Sufi preacher murdered in NashikSaam Tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : नाशिक (nashik) जिल्ह्यातील येवला परिसरात मुस्लिम धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती (sufi khwaja syed zarif chishti) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं देशात एकच खळबळ उडाली होती. आता प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे. अफगाणी नागरिक ख्वाजा सय्यद झरीफ चिश्ती यांच्या नाशिकमध्ये मालमत्ता हडप करण्यासाठी त्याच्याशी संबंधित व्यक्तींनी केलेल्या हत्येची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (Special Investigation Team - SIT) स्थापन करण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (sufi khwaja syed zarif chishti latest marathi news)

हे देखील पाहा -

आशिष शेलार यांनी पुढे या पत्रात म्हंटल आहे की, येवल्यात त्यांनी जी जमीन घेतली होती ही जमीन आणि मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे रोख स्वरूपात दिले गेले. ख्वाजा यांना त्यांच्या ग्राहकांसाठी विविध विधी करण्यासाठी हे पैसे दिले जात असल्याचे सांगण्यात आले. तर ख्वाजा यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देणारे लोक कोण होते? या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेचे परिणाम आणि मनी लाँड्रिंग आणि संबंधित बाबी आहेत. ख्वाजा या व्यक्तींना कोणती सेवा देत होता? ख्वाजाने किती पैसे कमवले? हा सगळा पैसा कुठे खर्च झाला? प्रत्यक्षात किती बेनामी संपत्ती संपादित केली आहे? हा पैसा राज्याच्या हिताच्या विरोधात काम करणार्‍या व्यक्तींकडे आला आहे किंवा प्रवाहित झाला आहे का? या प्रश्नांची सविस्तर चौकशी आणि कठोर कायदेशीर कारवाईची गरज असल्याची मागणी देखील शेलार यांनी केली आहे. त्याबाबचं ट्विटदेखील आशिष शेलार यांनी केले आहे.

Afghan Sufi preacher murdered in Nashik
धक्कादायक! परीक्षेच्या आदल्याच दिवशी तरुणीने संपवलं जीवन; औरंगाबादेतील घटना

दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनी (police) या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास करत चार संशयित आरोपींना अटक (arrest) केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी (nashik police) दिलेल्या माहितीनूसार चारही संशयित आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती यांचा खून हा मालमत्तेच्या कारणास्तव करण्यात आला आहे अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाल्याचे पाेलीसांनी स्पष्ट केले. धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता हडप करण्यासाठी हा खून झालेला आहे. या प्रकरणी गफार खान, गणेश झिंजाट, रवींद्र तोरे, पवन आहेर या चाैघांना अटक करण्यात आल आहे. या प्रकरणातील आणखी दोघांचा शाेध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील (superintendent of police sachin patil) यांनी दिली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com