मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केतकीला फेसबुक पोस्ट चांगलीच भोवली आहे. आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या फेसबुक पोस्टमुळं मराठी सिनेसृष्टीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केतकी ही शरद पवारांची माफी मागणार नाही, तोपर्यंत तिला सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) , अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi ) यांनीही केतकी चितळेवर टीका केली आहे.(Actor Sushant Shelar and actress asawari joshi comment on ketaki chitali's facebook Post )
हे देखील पाहा -
केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर अभिनेता सुशांत शेलारनं नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत म्हणाला,' केतकीची फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर लाज वाटली. केतकीला याआधी ट्रोलिंग झालं, तेव्हा मित्र म्हणून तिच्या पाठीशी उभा होतो. त्यावेळी तिचे प्रकरण आम्ही विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यापर्यंत घेऊन गेलो होतो. त्या सर्व प्रकियेमध्ये जाऊन देखील स्वत: केतकी चितळे असे भाष्य करत असेल तर निंदनीय आहे, असं मत मराठी अभिनेता सुशांत शेलार यांनी मांडले. पुढे सुशांत म्हणाला,' तिचे फेसबुकवरील पोस्टमधील विचार अतिशय वाईट आहेत. एवढंच नाही, तर तिच्या त्या पोस्ट बाबत मला काही बोलायचं नाही. नेहमी आम्ही कोणत्याही कलाकारांच्या पाठीशी उभे राहतो. अशा प्रकराचे पोस्ट लिहिणारे कलाकार चुकीचे आहेत, असेही मत सुशांत शेलार यांनी दिले.
अभिनेत्री आसावरी जोशीनं देखील केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. आसावरी जोशी म्हणाली, 'सोशल मीडियावर पोस्ट करताना मर्यादा असली पाहिजे. त्यात केतकीने फेसबुकवर टाकलेली पोस्ट ही निंदनीय आणि अतिशय चुकीची आहे. तसेच फेसबुक पोस्टसाठी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा वापर करणे ही तर अतिशय निंदनीय बाब आहे. लोकांना आणि कलाकारांना हे कळालं पाहिजे की, आपण सोशल मीडियावर काय लिहितोय आणि काय बोलतो आहे, असे मत अभिनेत्री आसावरी जोशी यांनी केतकी चितळेच्या पोस्ट बाबत व्यक्त केलं आहे. दरम्यान, मराठी अभिनेता सुशांत शेलार यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. त्याच्या वाहनाची समोरची काच फोडण्यात आली आहे. रविवारी रात्री २ वाजता ही घटना घडली. त्यानंतर सुशांत शेलारने पोलिसात तक्रार दाखल केली आहे
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.