Bribe : लाख रुपये मागितली लाच, पन्नास हजार घेताना अधिकारी ACB च्या जाळ्यात

एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.
ACB, Bribe, Nashik
ACB, Bribe, NashikSaam Tv

Nashik News : भूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकास एसीबीने पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पकडले. एसीबीने (acb) दाेन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चाैकशी करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

ACB, Bribe, Nashik
Shamika Chipkar Sets World Record : लाटांशी टक्कर देत बारा वर्षीय शमिकाने अरबी समुद्रात नाेंदविला विश्वविक्रम

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेत जमिनीचा हिस्सा (नमुना 12) लिखाण प्रमादाची झालेली चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी - एक लाख रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी करण्यात आली हाेती.

या नंतर तक्रारदार आणि अधिकारी यांच्यात तडजोड झाली. तडजाेडीअंती तक्रारदारांकडून 50 हजार रुपये (money) स्वीकाराना अधिका-यांना एसीबीने पकडले. या प्रकरणी जिल्हा अधीक्षक महेश कुमार महादेव शिंदे आणि कनिष्ठ लिपिक अमोल भीमराव महाजन यांना ताब्यात घेतल्याचे एसीबीच्या अधिका-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com