तुम्ही एवढ्या वर्षात शेतकऱ्यांच ओक्के का केलं नाही; चव्हाणांच्या टिकेवर सत्तरांच प्रतिउत्तर

आमचं सरकार येऊन केवळ 45 दिवस झाले आहेत. आम्ही ओक्के झालो आता शेतकऱ्यांनाही ओक्के करु - अब्दुल सत्तर
Abdul Sattar/ Ashok Chavan
Abdul Sattar/ Ashok ChavanSaam Tv

नांदेड - कांग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काय झाडी, काय हाॅटेल, काय डोंगर सगळ ओक्के आहे. पण राज्यातला शेतकरी ओके नाही अशी टीका केली होती त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी चव्हाणांना प्रतिउत्तर दिल आहे. एवढे वर्ष तुमच्या हातात सत्ता होती तेंव्हा तुम्ही शेतकऱ्यांना ओक्के का केलं नाही असा सवाल करत आमचं सरकार येऊन केवळ 45 दिवस झाले आहेत. आम्ही ओक्के झालो आता शेतकऱ्यांनाही ओक्के करु असं वक्तव्य करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाना साधला. सत्तार आज नांदेडच्या अतिवृष्टी भागाचा दौरा करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

हे देखील पाहा -

नुकसानीचे पंचनामे पुर्ण नाही

नुकसानीचे पंचनामेच पुर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांना पोळ्यापुर्वी मदत मिळणे अवघड असल्याचं वक्तव्य खुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. आणखी बरीच प्रक्रीया बाकी असून, शेतकऱ्यांना लवकरत लवकर मदत मिळण्याची शक्यता धुसर दिसत असल्याचे सत्तार यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी सत्तार यांनी आठ दिवसात खात्यात पैसे जमा होतील असे अश्वासन दिले होते. त्यानंतर आज त्यांच्या या वक्तव्यावरुन घुमजाव केल्याचं दिसत आहे. सत्तार नांदेड मध्ये बोलत होते.

Abdul Sattar/ Ashok Chavan
Crime: डोंबिवलीत सोन्याची बनावट नाणी देऊन फसवणूक; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

कृषी दुकानदार एका सोबत दुसरे खत घेण्याची शेतकऱ्यांवर बळजबरी करतात. त्याच बरोबर पिककर्ज वाटपात शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. या दोन्ही मुद्द्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून शेतकऱ्यांच्या तक्रारीची तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याच्या सुचना आपण दिल्या असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com