दुर्दैवी : बकऱ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या युवकाचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या लक्ष्मणला आई-वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.
Farmer's Death
Farmer's Deathसुरेंद्र रामटेके
Published On

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) कारंजा तालुक्यातील कन्नमवार गावामध्ये बकऱ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या युवकावर वाघाने हल्ला केला या वाघाच्या हल्ल्यात लक्ष्मण उके वय 33 वर्ष हा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाघाच्या  हल्ल्यात ठार झाल्याची ही दुसरी घटना असल्याने गावकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. गावालगत असलेल्या शेतातच ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सकाळच्या सुमारास लक्ष्मण नेहमी प्रमाणे शेतात बकऱ्यांसाठी चारा आणायला गावालगत असलेल्या , गव्हाच्या शेतात गवत कापत असतांनाच अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला, त्याच्या शरीराचा मोठ्या प्रमाणात भाग वाघाने (Tiger) खाल्ल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घरच्यांनी लक्ष्मण बराच वेळ होऊनही घरी परत न आल्याने घरच्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिल्यानंतर शोधाशोध केल्यानंतर नागरिकांना त्याचा मृतदेह गव्हाच्या शेतात आढळून आला, याबाबत तात्काळ वनविभाग व पोलिसांना (To the forest department and police) माहिती देण्यात आली,त्यांनी पंचनामा केला, लक्ष्मण उके हा भूमिहीन असल्याने रोजमजुरीचे काम करत होता, या घटनेमुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उघडयावर आले आहे, ही वाघाच्या  हल्ल्यात ठार झाल्याची येथील दुसरी घटना आहे, मृतक लक्ष्मणला आई-वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.

Farmer's Death
राष्ट्रवादीचा दाऊदशी संबंध, मग पंतप्रधान पवारांच्या घरी का जातात; आंबेडकरांचा सवाल

कन्नमवार परिसरात वारंवार वन्य प्राण्याने हल्ले केल्याच्या घटना घडत आहे, त्यामुळे अनेकदा शेतकरी व शेतमजूर जखमी होत आहे, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागत आहे, त्यामुळे वनविभागाने ठोस पावले उचलून याबाबत वन्यप्राण्यांकडून संरक्षणासाठी काही व्यवस्था करावी, व जनजागृती करिता काही उपाय योजना करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे, मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची गावात चर्चा आहे .

दरम्यान या मृत्यूनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात देतांना उघडयावर आलेल्या या भूमिहीन कुटुंबाला जो पर्यंत आर्थिक मोबदला किंवा मृतकाच्या पत्नीला वनविभागात नोकरी असे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही असा पवित्रा घेण्यात आला होता, पण काही लोकांच्या मध्यस्थी मुळे मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.

Edited By -Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com