मावळ: सुर्वण महोत्सवी भारत देश कसा असावा? या विषयावर देशभरातील विद्यार्थ्यांकडून त्यांची मते मांडण्याची संधी पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली होती. देशभरातून 75 लाख पोस्टकार्ड पत्रे (Postcard) पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO India Office) पाठविण्यात आली होती. यामधून लोणावळा (Lonavala) शहरातील व्ही.पी.एस हायस्कूल (VPS High School, Lonavla) व द. पु. मेहता महाविद्यालयाची (D.P.Mehta Jr. College, Lonavala) विद्यार्थींनी गौरी गायकवाड (Gauri Gaikwad) हिच्या पत्राची निवड झाली आहे. शाळा व लोणावळा पोस्ट कार्यालयाकडून याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) मावळ तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांची ती नात आहे.
हे देखील पहा -
पोस्ट ऑफीस लोणावळा (Lonavla Post Office) तर्फे प्रत्येक शाळेमध्ये पोस्ट कार्ड दिले होते. त्यामध्ये सुवर्ण महोत्सवी भारत देश कसा असावा? त्याबद्दल स्वतःचे विचार लिहून देशाचे माननीय पंतप्रधान ह्यांच्या नावाने पंतप्रधान कार्यालय येथे पाठविले गेले होते. त्यामध्ये संपूर्ण भारतामधून पाठविलेले 75 लाख पोस्ट कार्डमधून तिचे पत्र निवडले गेले. सर्व विद्यार्थ्यांना "भारत देश 2047 ला कसा असावा ..?" ह विषय देण्यात आला होता. त्यात गौरी ने 2047 साली भारतात मुलींना शिक्षण मिळावे, भारतात कोणत्याही प्रकारचा जातीय तेढ नसावा तसेच भारत देश हा जगात कोहिनूर हिऱ्यासारखा चमकावा याबाबत लिहिले. एकूण 75 लाख पत्रांमधून गौरीचे पत्र हे पंतप्रधान कार्यालयात निवडले गेले. गौरीचे पत्र हे थेट पंतप्रधान कार्यालयात निवडले गेले त्यामुळे आता गौरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.