Suicide
Suicideअभिजित घोरमारे

प्रेमप्रकरण मुलीच्या आईला समजलं, बदनामीच्या भितीने त्यांने आयुष्य संपवलं

प्रेमसंबंधातून २१ वर्षीय युवकाने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
Published on

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara District) लाखणी तालुक्यातील सोमलवाडा येथील २१ वर्षीय युवकाने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृष्णा शालिक अतकरी वय वर्ष २१ रा. सोमलवाड़ा असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर यावकावर हत्येच्या गुन्ह्याची (Crime) नोंद आहे.

मृत कृष्णाचे त्याच्या गावातील अल्पवयीन मुली बरोबर प्रेमसंबंध जुळले होते. मात्र त्यांच्या या प्रेमप्रकरणाची माहिती मुलीच्या आईला झाल्याने मुलीच्या आईने कृष्णासोबत भांडण केले. आता आपली पुन्हा बदनामी गावभर होणार याची भीती मनात बाळगून कृष्णाने स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.

हे देखील पहा -

काल भांडण झाल्यामुळे तो रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी त्याचा शोध घेतला, मात्र कृष्णाचा पत्ता लागला नाही. अखेर आज सकाळी गावातील एका व्यक्तीला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान त्याचा मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. विशेष म्हणजे या आधी सुद्धा मृतकाने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com