सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील (Jawahar Navodaya Vidyalaya) एका बारावीच्या विद्यार्थ्यांने शौचालयाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली आहे. देवानंद ज्ञानेश्वर भोसले (Devananda Dnyaneshwar Bhosale) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान देवानंदने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असून त्याचा शोध घ्या तसेच आम्हाला CCTV फुटेज द्या अशी मागणी मृत देवानंदच्या नातेवाईकांनी केली आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार -
वस्तुस्थिती समजल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत देवानंदच्या आई-वडील आणि नातेवाइकांनी काही काळ मोहोळ येथे रस्त्यावर ठिय्या दिला. यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. आमची दखल घ्या, गरिबाला न्याय द्या; असं म्हणत आई-वडील आणि नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय तसेच पोलिस ठाण्यासमोर आक्रोश केला.
हे देखील पहा -
देवानंद भोसले हा पारधी समाजाच्या विद्यार्थी बारावीत शिकत होता. रात्री 8 वाजता सर्व विद्यार्थी भोजनालय कक्षात जेवणासाठी जातात. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. हजेरी घेताना नेमका देवानंद अनुपस्थित दिसला. शिक्षकांनी चौकशी केली असता तो दिसून आला नाही. मात्र एका सदनातील शौचालय बंद असल्याचे दिसले. आत कोण आहे का? अशा शिक्षकांनी हाका मारल्या मात्र आतून प्रतिसाद आला नाही.
ही घटना शिक्षकांनी वरिष्ठांना व पोलिसांना कळवली. पोलिस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी हाका मारल्या मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडताच देवानंद याने शौचालयाच्या खिडकीला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत देवानंद याचा मृतदेह विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमक्ष उतरवला व मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) पाठवून दिला. मृत देवानंदची आई अश्विनी भोसले आणि वडील ज्ञानेश्वर भोसले यांनी आपला मुलगा आत्महत्या करणाऱ्या पैकी नव्हता त्याच्यावर कोणीही परिस्थिती आणली. याची चौकशी झाली पाहिजे. महाविद्यालयाच्या विरोधात आमची तक्रार असल्याचेही देवानंदचे आईवडील म्हणाले म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.