९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुन्हा तारीख पे तारीख...

नाशिकमधील साहित्य संमेलनाचं ठिकाण पुन्हा बदलणार असून हे साहित्य संमेलन एचपीटी कॉलेज ऐवजी भुजबळ नॉलेज सिटीत होण्याची शक्यता आहे.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुन्हा तारीख पे तारीख...
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुन्हा तारीख पे तारीख...अभिजित सोनावने
Published On

नाशिक: ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख आणि जागा पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीचं साहित्य संमेलन लांबणीवर पडलेलं असतांना आता पुन्हा एकदा तारखांची अनिश्चितता आणि जागेतही बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येतेय. (94th All India Marathi Sahitya Sammelan postponed again)

हे देखील पहा -

राज्य सरकारनं २२ ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नियम आणि अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतलेला असला, तरी खुल्या जागांवरील कार्यक्रमांवरील निर्बंध अद्यापही कायम आहेत. सरकारच्या नियमांनुसार सर्व कार्यक्रम बंदिस्त सभागृहात व्हावेत, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे एचपीटी कॉलेजच्या खुल्या मैदानावरील साहित्य संमेलन दुसऱ्या जागी घेण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली आहे. साहित्य संमेलनासाठी येणारे बरेचसे पाहुणे हे भुजबळ नॉलेज सिटीच्या विश्रामगृहातच राहणार असल्यानं भुजबळ नॉलेज सिटीतच संमेलन घेण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे. तर संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्याकडून नोव्हेंबरमधील संमेलनाच्या तारखा बदलण्याबाबत स्वागत समितीला विनंती करण्यात आली आहे.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुन्हा तारीख पे तारीख...
नाशिकमधील फटाके बंदीवर आज निर्णय होणार; निर्णयावरून गोंधळाची शक्यता...

त्यामुळे साहित्य संमेलन डिसेंबर महिन्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ३ ते ५ डिसेंबरच्या कालावधीत साहित्य संमेलन शक्य असल्याचं बोललं जात असून साहित्य महामंडळानं याबाबत होकार दिल्यास या तारखा निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com