सावधान! कोरोना पुन्हा फोफावतोय; नागपुरात एकाच दिवशी आढळले ९ रुग्ण

बुधवारी ग्रामीणसह शहरातही रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.
Nagpur Corona Virus
Nagpur Corona VirusSaam Tv
Published On

नागपूर : राज्यातील कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असतानाच बुधवारी नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९ नवीन रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाची तिसरी लाट (Covid 3rd Wave) ओसरल्यानंतर अचानक ९ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमधील नागपुरातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. (Nagpur Corona Latest News)

Nagpur Corona Virus
मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

नव्याने आढळून आलेल्या ९ रुग्णांपैकी ४ रुग्ण शहरातील तर ५ रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याचं समजतं आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या ग्रामीण भागात सातत्याने नवीन रुग्ण आढळत असले तरी शहरी भागात मात्र फारसे रुग्ण आढळत नव्हते. परंतु बुधवारी ग्रामीणसह शहरातही रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान या नवीन रुग्णांमुळे शहरी भागातील कोरोनाबाधितांची आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९९ हजार ६६९ वर पोहचली आहे. तर, ग्रामीण भागातील आतापर्यंतची रुग्णसंख्या १ लाख ६८ हजार २१८ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोनामुळे दगावला नाही. सध्या जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९८.२१ टक्के इतके आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com