हतनूर धरणाचे 41 तर सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबारमधील हतनूर धरणाचे 41 दरवाजे व सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाचे 41 तर सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
धरणाचे 41 तर सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारादिनू गावित
Published On

नंदुरबार: जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदी पात्रात हतनूर धरणाचे 41 दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडल्याने तापी नदीपात्रात 76 हजार 993 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे 3 मीटर उघडल्याने तापी नदीपात्रात 91 हजार 665 क्युसेक्स विसर्ग होत आहे. पुढील 72 तासांत हतनूर आणि सुलवाडे प्रकल्पातून तापी नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. (41 gates of Hatnur dam and 12 gates of Sulwade project were opened, warning to citizens)

हे देखील पहा -

तसेच बॅरेजच्या बाजूतील मुक्त पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन प्रकल्पाच्या तसेच नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पाणीसाठा आणि विसर्गामुळे पुरस्थिती उद्भवू नये व सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शहादा तालुक्यातील सारंगखेडा प्रकल्पाचे 7 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 37 हजार 321 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 11 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 41 हजार 961 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे.

धरणाचे 41 तर सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १२ दरवाजे उघडले

पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com